छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत आणि वादग्रस्त असलेल्या शो पैकी एक म्हणजे बिग बॉस. बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता नुकताच जाहीर झाला. बिग बॉसच्या घरात वाईल्डकार्ड एंट्रीघेतलेला स्पर्धक एल्विश यादव हा यंदाच्या ‘बिग बॉस ओटीटी २’ चा विजेता ठरला. एल्विशने बिग बॉस ओटीटीच्या ८ आठवड्यांच्या खेळात एल्विशने चौथ्या आठवड्यात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. अभिषेक आणि एल्विश यांपैकी कोण जिंकणार? याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर या अटीतटीच्या लढाईत एल्विश यादवने बाजी मारली. त्याने बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. विजेत्या स्पर्धकाला बिग बॉसकडून ट्रॉफी आणि तब्बल २५ लाखांचा धनादेश देण्यात आला.

बिग बॉस ओटीटीच्या टॉप पाच स्पर्धकांमध्ये पूजा भट्ट, अभिषेक मल्हान, एल्विश यादव, मनिषा रानी व बेबिका धुर्वे या स्पर्धकांचा समावेश होतो. त्यानंतर अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव या दोघांमध्ये मतांची जोरदार टक्कर पाहायला मिळाली. अखेर एल्विशने विजेतेपदावर नाव कोरत इतिहास रचला. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये जन्म झालेल्या एल्विश यादव अतिशय साधेपणाने आपले जीवन जगतो. मात्र हे फार कमी लोकांना माहिती आहे की एल्विश यादव हा आलिशान कारचा चहात आहे. आज आपण एल्विश यादवच्या कार कलेक्शनबद्दल जाणून घेऊयात.

हेही वाचा : बजाज प्लॅटिना आणि हिरो पॅशनची उडाली झोप, देशात लॉन्च झाली Honda ची ‘ही’ बाईक, किंमत फक्त…

पोर्श 718 बॉक्सस्टर (Porsche 718 Boxster)

एल्विश यादवच्या कार कलेक्शनमधील सर्वात आलिशान आणि महागडी कार म्हणजे त्याने अलीकडेच पोर्श 718 बॉक्सस्टर खरेदी केली आहे. ही सुपर स्पोर्ट्स कारमध्ये २.० लिटरचे टर्बोचार्ज इंजिन मिळते. यामध्ये ३०० एचपी पॉवर आणि ३८० NM टॉर्क जनरेट करते. या स्पोर्ट्स कारचा टॉप स्पीड २७५ किमी प्रतितास इतका आहे. ०ते १०० किमी प्रतितास हा वेग ही कार फक्त ५.१ सेकंदात पकडते असा कंपनीचा दावा आहे. या लक्झरी कारची सुरुवातीची किंमत १.४१ कोटी इतकी आहे.

टोयोटा फॉर्च्युनर लीजेंडर (Toyota Fortuner Legender)

एल्विश यादवच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका लक्झरी कारचा समावेश आहे . ती म्हणजे योटा फॉर्च्युनर लीजेंडर एसयूव्ही. ही एसयूव्ही देशातील अनेक सेलिब्रेटींच्या ताफ्यात दिसून येते. या एसयूव्हीला २.८ लिटरचे डिझेल इंजिन मिळते जे १७७ एचपी पॉवर आणि ४५० एनएम टॉर्क जनरेट करते. एसयूव्हीचा टॉप स्पीड हा १७५ किमी प्रतितास आहे. या एसयूव्ही सुरुवातीची किंमत ४२ लाख (एक्स-शोरूम ) इतकी आहे.

हेही वाचा : Photos: ‘बिगबॉस ओटीटी २’ विजेता एल्विश यादवबद्दल ‘या’ गोष्टी माहितीय का?

महिंद्रा थार (Mahindra Thar)

एल्विश यादवच्या कार कलेक्शनमध्ये मध्ये तिसरी एसयूव्ही आहे ती म्हणजे महिंद्रा थार. ज्याची खरेदी एल्विश यादव नुकतीच केलेली आहे. त्याने याच एसयूव्हीचा एक व्हिडीओ देखील युट्युबवर शेअर केला आहे. ज्यामध्ह्ये आपल्या मित्रांना यातून फेरफटका मारताना दिसत आहे.त्याच्याकडे महिंद्रा थारचे ४×४ चे टॉप मॉडेल आहे ज्याची किंमत २२ लाख रुपये आहे.

हेही वाचा : अभिनेता हृतिक रोशन ने शेअर केला ‘या’ स्पोर्ट्स बाइकचा टिझर, २९ ऑगस्ट रोजी होणार लॉन्च

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ह्युंदाई व्हेरना (Hyundai Verna )

ह्युंदाई व्हेरना ही एल्विश यादवच्या कर कलेक्शनमधील चौथी कार आहे. ही एक सेडान कार आहे. एल्विश यादवने युट्युबवर प्रसिद्ध होण्याआधी ही सेडान खरेदी केली होती. ह्युंदाईच्या या सेडानमध्ये १.५ लिटरचे डिझेल इंजिन असून ते ११५ एचपी पॉवर आणि २५० एनएम टॉर्क जनरेट करते. एल्विश यादवकडे असलेल्या या सेडानचा टॉप स्पीड १८० किमी प्रतितास इतका आहे. या मॉडेलची किंमत १५ लाख रुपये इतकी आहे.