BMW X1 Launched In Joytown: BMW इंडियाने शनिवारी अद्ययावत BMW X1 स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी व्हेईकल (SAV) लाँच केली. बंगळुरू येथे पार पडलेल्या जॉयटाऊन या कार्यक्रमात पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारातील नव्या कोऱ्या X1 गाडीचे अनावरण झाले. BMW ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पावह यांनी दिलेल्या माहितीनुसार या गाड्यांची प्री बुकिंग सुरु झाली असून BMW X1 डिझेलची डिलिव्हरी मार्चमध्ये आणि पेट्रोलची डिलिव्हरी जूनपासून सुरू होईल. सध्या ही कार कंपनीच्या डीलरशिपवर ५०,००० रुपयांच्या टोकन रकमेसह ग्राहक बुक करू शकतात.
BMW X1 इंटिरिअर डिझाईन
नवीन BMW X1 ची लांबी ५३ mm लांब, रुंदी २४ mm, उंची ४४ mm आणि व्हीलबेस २२ mm आहे नव्या BMW X1 लक्झरी SAV मध्ये हाय बीम असिस्टंटसह अॅडप्टिव्ह एलईडी हेडलाइट्स, लाइव्ह कॉकपिट, रिमोट फंक्शन्समध्ये मदत करणारे माय बीएमडब्ल्यू अॅप, आरामदायी वापरासाठी डिजिटल की, हार्मन कार्डन ऑडिओ सिस्टम, पार्किंग आणि रिव्हर्सिंग असिस्टंट, यासह अनेक नवीन वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
BMW X1 इंजिन क्षमता
नवीन BMW X1 1.5-लीटर, तीन-सिलेंडर पेट्रोल (sDrive 18i) आणि 2.0-लिटर, चार-सिलेंडर डिझेल (sDrive 18d) इंजिन पर्यायांसह येते. BMW X1 (डिझेल) ८.९ सेकंदात ० ते १०० किमी/ताशी वेग प्राप्त करू शकते, तर, BMW X1 (पेट्रोल) ० ते १०० किमी/ताशी ९.२ सेकंदात जाऊ शकते.

हे ही वाचा<< BMW ने लाँच केली आजवरची सर्वात प्रगत SUV! २ कोटी ६० लाखाच्या गाडीचा पहिला लुक पाहून व्हाल थक्क
BMW X1 किंमत
बीएमडब्ल्यूच्या पेट्रोल व्हेरियंटची किंमत ४५. ९० लाख आहे, तर डिझेल व्हेरिएंटची किंमत ४७.९० लाख आहे. या दोन्ही वाहनांचे उत्पादन कंपनीच्या चेन्नई येथील प्लांटमध्ये केले जाते. आराम आणि लक्झरी यांचा उत्तम मिलाप BMW X1 मध्ये पाहायला मिळत आहे.