टाटा मोटर्सकडून पंच मायक्रो एसयूव्ही खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. ही मायक्रो एसयूव्ही केवळ ६२ हजार रुपयांच्या डाउन पेमेंटसह घेता येईल. अलीकडेच टाटा मोटर्सने त्यांच्या सर्व प्रवासी वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. ज्यामध्ये कंपनीने पंच एसयूव्हीच्या किमतीत १६ हजार रुपयांनी वाढ केली आहे, ही वाढीव किंमत १८ जानेवारीपासून लागू झाली आहे. जर तुम्ही पंच मायक्रो एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या तुम्हाला महिना किती ईएमआय भरावा लागेल.
टाटा मोटर्सचा दावा आहे की, ही एसयूव्ही मॅन्युअल ट्रान्समिशनवर १८.९७ किमी आणि एएमटीवर १८.८२ किमी मायलेज देते. टाटाने या एसयूव्हीमध्ये १.२ लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे, जे ६.५ सेकंदात ० ते ६० किमी प्रतितास आणि १६.५ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग देते. यात ७ इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. स्टीयरिंग कंट्रोल, ३६६ लीटर बूट स्पेस, पुढच्या आणि मागील बाजूस पॉवर विंडो, अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, क्रूझ कंट्रोल, रिअल फ्लॅट सीट, पूर्णपणे ऑटोमेटेड तापमान नियंत्रण यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. ग्लोबल एनसीएपी क्रॅश चाचणीमध्ये टाटा पंच एसयूव्हीला प्रौढांच्या सुरक्षिततेसाठी पंचतारांकित रेटिंग मिळाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि कॉर्नर सेफ्टी कंट्रोलसह इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन उपलब्ध असेल.
टाटा मोटर्सने पंच मायक्रो एसयूव्ही आठ प्रकारांमध्ये लॉन्च केली. त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत ५,६४,९०० रुपये आहे आणि त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत ९,२८,९०० रुपये आहे. टाटा पंचचा बेस व्हेरिएंट ६२,००० रुपयांच्या डाउन पेमेंटवर घेऊ शकता. यासाठी ११,८२० रुपये मासिक ईएमआय भरावे लागेल.