नविन चारचाकी गाडी घेतल्यानंतर आपण आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. गाडीला जरासा स्क्रॅच जरी आला तरी मनाला लागते. यासाठी त्यावर स्टिकर आणि व्यवस्थित वाटावं यासाठी प्रयत्न करतो. गाडी स्वच्छ आणि चांगली दिसावी यासाठी सर्व्हिस सेंटरमध्ये धुवायला नेतो. मात्र असं असलं तरी कारची सफाई आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी काही बाबींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारचा रंग चांगला दिसण्यासाठी कार वॅक्स आणि कार पॉलिश असे दोन प्रकार आहेत. मात्र यातील फरक माहिती नसल्याने अनेक चुका होतात. पॉलिश हा एक प्रकारची रंग सुधारणा आणि चकचकीतपणा आणण्याची प्रक्रिया असते. तर वॅक्सिंगमुळे रंगावर संरक्षण कवच तयार केलं जातं. त्यामुळे स्क्रॅचपासून संरक्षण होतं.

कार वॅक्स करणे म्हणजे नखं पॉलिश करण्यासारखाच प्रकार आहे. नखावर जसा संरक्षणात्मक थर लावला जातो. त्या पद्धतीने कार वॅक्स कार्य करते. कार वॅक्समधील गुणधर्मामुळे सूर्य किरणे आणि उष्णतेपासून रंगाचं संरक्षण होतं. त्यामुळे गाडीचा रंग फ्रेश दिसतो. दुसरीकडे, कार पॉलिशमुळे वाहनाच्या पृष्ठभागावरून लहान स्क्रॅच काढण्यास मदत होते. गाडीचा रंग निस्तेज झाला असेल किंवा ऑक्सिडेशनमुळे चमक गमावली असेल तर पॉलिश केल्याने चमक येते. मात्र असं असलं तरी पॉलिश नियमीत केली जात नाही. त्याचे दुष्परिणाम होऊन रंग खराबही होऊ शकतो. कारला वॅक्स करायचं की पॉलिश हे ठरवण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर बोटांनी रंगावर हलकी बोटं फिरवून बघा. जर तुमच्या हाताला खडबडीतपणा जाणवतो की नाही हे तपासून घ्या. पृष्ठभाग गुळगुळीत असेल तर फक्त वॅक्सिंग करून घ्या. जर तुमच्या हाताला खडबडीतपणा आणि स्क्रॅचेस दिसत असतील तर पॉलिश करा आणि त्यानंतर वॅक्सचा थर चढवावा.

Voltron Motors च्या टू सीटर इ-सायकलची जोरदार चर्चा! फक्त ४ रुपयात होते फुल चार्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारला वारंवार पॉलिश केल्यास रंग खराब होऊ शकतो. त्यामुळे पुन्हा रंग लावण्याची वेळ येऊ शकतो. त्यामुळे सौम्य केमिकल्स असलेले पॉलिश निवडावे. पॉलिश गाडीच्या पृष्ठभागावर सर्वाधिक काळ टिकते. एक वर्षापर्यंत वॉटर बीडिंग ठेवते. तर वॅक्सिंग केल्यास उष्णतेमुळे ते वितळू शकते. खासकरून छत आणि हुडवरील रंग निस्तेज होऊ शकतो.