फ्रान्सची कार कंपनी Citroen ने आपल्या C3 हॅचबॅकची किंमत वाढवली आहे. हे जुलै २०२२ मध्ये सादर करण्यात आले होते, त्यानंतर त्याची किंमत ५.७१ लाख ते ८.०६ लाख रुपये (एक्स-शोरूम) होती. जेव्हा कंपनीने हे सादर केले तेव्हा घोषणा केली गेली की ही त्याची प्रास्ताविक किंमत आहे आणि भविष्यात त्याची किंमत वाढविली जाऊ शकते. त्यानुसारच, कंपनीने सिट्रोएनच्या जवळपास सर्व प्रकारांच्या किमती १७ हजार रुपयांनी वाढवल्या आहेत. तर टर्बो पेट्रोल इंजिनसह टोपो-स्पेक लाइव्ह ट्रिममध्ये ९,००० रुपयांची वाढ झाली आहे. Citroen C3 ची किंमत आता ५.८८ लाख ते ८.१५ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नव्या आणि जुन्या किमती खालीलप्रमाणे

C3 प्रकार             नवीन किंमत        जुनी किंमत        फरक

१.२ पेट्रोल लाईव्ह        ५.८८ लाख         ५.७१ लाख         १७,०००

१.२ पेट्रोल फील         ६.८० लाख         ६.६३ लाख         १७,०००

१.२ टर्बो पेट्रोल फील     ८.१५ लाख         ८.०६ लाख          ९,०००

Citroen C3 चे फिचर्स

Citroen C3 सहा प्रकारांमध्ये येते. हे लाइव्ह आणि फील या दोन ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे आणि दोन इंजिन पर्यायही यात मिळतात. पहिला पर्याय म्हणजे १.२-लिटर पेट्रोल युनिट जे ८०.८७ bhp आणि ११५ एनएम पॉवर निर्माण करते. दुसरीकडे, १.२-लिटर टर्बो पेट्रोल १०८ bhp आणि १९० एनएम पॉवर जनरेट करते. आधीचे ५-स्पीड मॅन्युअल आणि नंतरचे ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

आणखी वाचा : Kia ने भारतातील ४४ हजार १७४ कार्स मागवल्या परत; जाणून घ्या कारण…

Citron C3 कंपनीच्या C-cubed प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे. लूकच्या बाबतीत, कारला सिट्रॉन डिझाइन आणि स्टाइलिंग सिग्नेचर, शेवरॉन (ब्रँड लोगो) सह ड्युअल-टोन ट्रीटमेंट आणि हेवी क्लॅडिंगसह कॉन्ट्रास्ट इन्सर्ट मिळतात. कारला दहा बाह्य रंग पर्याय आहेत, ज्यामध्ये ड्युअल-टोन पर्याय आणि सानुकूलित रंग पर्यायांचा समावेश आहे, इतर वैशिष्ट्यांमध्ये स्पोर्टी अलॉय व्हील आणि रूफ रेलचा समावेश आहे.

हॅचबॅकला १०-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, चार स्पीकर आणि उंची-समायोज्य ड्रायव्हर सीट मिळते. हे Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटीसह येते. याशिवाय मिरर स्क्रीन फंक्शन देखील उपलब्ध आहे. USB चार्जर आणि १२V सॉकेट सारख्या इतर वैशिष्ट्यांसह कारला फ्लॅट-बॉटम मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील देखील मिळते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citroen c3 prices hiked pdb
First published on: 04-10-2022 at 17:45 IST