CNG Cars Discounts December 2023: महागड्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे देशभरातले वाहनधारक त्रस्त आहेत. मध्यमवर्गीयांचं तर या किंमतींमुळे कंबरडं मोडलं आहे. पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतींमुळे अनेक जण सीएनजी कार घ्यायला लागले आहेत. आता देशात सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांच्या मागणीत वाढ झाली आहे. तुम्ही देखील या काळात नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुम्ही एखादी उत्तम सीएनजी कार शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
वर्ष २०२४ जवळ येत आहे आणि त्यानिमित्ताने अनेक कार कंपन्या आपल्या मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहेत. या वर्षाच्या शेवटी म्हणजे डिसेंबरमध्ये सीएनजी कारवर कंपन्या अनेक ऑफर्सही देत आहेत. यामध्ये मारुतीपासून ह्युंदाई, टोयोटा आणि इतर अनेक कंपन्यांच्या सीएनजी कारचा समावेश आहे. जाणून घेऊया कोणती कंपनी आपल्या CNG कारवर किती सूट देत आहे…
- मारुती सुझुकी
या यादीत पहिले नाव मारुती सुझुकीचे आहे. कंपनी आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कॉम्पॅक्ट सेडान स्विफ्टच्या CNG प्रकारावर रु. २५,००० ची रोख सूट देत आहे. याशिवाय Celerio आणि S-Presso च्या CNG मॉडेल्सवर अनुक्रमे ३०,००० आणि २५,००० रुपयांची रोख सूट दिली जात आहे.
(हे ही वाचा: ‘या’ SUV कारच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी, ३० मिनिटात १ हजार गाड्यांची विक्री अन् कंपनीला बंद करावं लागलं बुकिंग)
- ह्युंदाई मोटर्स
Hyundai बद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी तिच्या Aura CNG वर २०,००० रुपयांची रोख सवलत, १०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ३,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे. याशिवाय, ग्राहकांना ३५,००० रुपयांची रोख सवलत, १०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ३,००० रुपयांची कॉर्पोरेट सवलत ग्रँड i10 Nios च्या CNG प्रकारांवर देखील मिळू शकेल.
- टाटा मोटर्स
देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स देखील त्यांच्या CNG कारच्या श्रेणीवर वर्षाच्या शेवटी आकर्षक ऑफर देत आहे. या महिन्यात, Tata Altroz च्या CNG प्रकारावर २५,००० रुपयांची रोख सूट दिली जात आहे. या व्यतिरिक्त, ग्राहकांना या कारवर १०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि १०,००० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देखील मिळू शकतो. त्याच वेळी, टाटा टियागोच्या सीएनजी प्रकारांवर ५,००० रुपयांची रोख सूट, ३०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि १५,००० रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील दिली जात आहे. एकंदरीत, तुम्ही Tiago CNG च्या खरेदीवर ५०,००० रुपये वाचवू शकता.
- टोयोटा मोटर
टोयोटा मोटरने डिसेंबरमध्ये ग्लान्झा सीएनजीवरही सूट जाहीर केली आहे. या महिन्यात Glanza CNG च्या खरेदीवर २०,००० रुपयांची रोख सूट दिली जात आहे. याशिवाय या कारवर २०,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळू शकतो. कंपनी ग्लान्झा वर चौथ्या आणि पाचव्या वर्षांसाठी ११,००० रुपयांपर्यंतची विस्तारित वॉरंटी देखील देत आहे.