फेडेक्स एक्सप्रेस ने भारतात केली इलेक्ट्रिक वाहनांची चाचणी

वेगाने वाढत असलेल्या इ-कॉमर्स विकासामुळे वाहतूक वाढत आहे.

फेडेक्स एक्सप्रेस ने भारतात इलेक्ट्रिक वाहनांची चाचणी केली. (photo credit: indian express)

जगातील सर्वात मोठी एक्स्प्रेस वाहतूक कंपनी असलेल्या FedEx Corp. (NYSE: FDX) ची उपकंपनी असलेल्या FedEx Express ने २०४० पर्यंत कार्बन न्युट्रल होण्याच्या त्यांच्या जागतिक ध्येयाचा एक भाग म्हणून भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या चाचण्यांना सुरुवात करत असल्याची घोषणा यावेळी कंपनीकडून करण्यात आली आहे.

वाहनांची चाचणी

इलेक्ट्रिक वाहनाची चाचणी बंगळूरू येथे एका महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा असून, FedEx Express कार्यक्षेत्रामध्ये वाहन तंत्रज्ञानाची चाचणी करण्यात येणार आहे. यात संपूर्ण सामानासह नेहमीच्या मार्गावर वाहनाची कार्यशील परिणामकता तपासली जाईल. सकारात्मक चाचणी निकालांनंतर FedEx Express च्या चाचण्या दिल्लीमध्ये करण्यात येणार आहे.

वेगाने वाढत असलेल्या इ-कॉमर्स विकासामुळे वाहतूक वाढत आहे. भारतातील FedEx वाहतूक ताफ्यात भर घालत असलेल्या प्रत्येक नव्या इलेक्ट्रिक वाहनामुळे पाच प्रवासी कारला लागेल इतका इंधनाचा वापर आणि उत्सर्जन कमी होईल.

FedEx Express च्या इंडिया ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष मोहम्मद सायेघ यांनी यावेळी संगितले की, “संपूर्ण जगाला जबाबदार पद्धतीने आणि स्त्रोतपूर्ण पद्धतीने जोडण्याचे FedEx Express चे ध्येय आहे आणि भारतात आमच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या चाचणीची घोषणा करताना त्यांना प्रचंड आनंद होत असल्याच त्यांनी यावेळी सांगितले. तसेच २०४० पर्यंत कार्बन न्युट्रल होण्याच्या त्यांच्या जागतिक ध्येयाशी सुसंगत अशी ही गोष्ट आहे.” भारतात इ-कॉमर्स ची वाढ होत असताना पर्यावरणावरील भार कमी करून या प्रगतीला पाठबळ देण्याचे मार्ग सातत्याने शोधत असल्याचे सांगत, इलेक्ट्रिक वाहनांच्या चाचण्यांच्या सुरुवातीने या ध्येयाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे नेले आहे,” असेही ते यावेळी म्हणाले.

वाहनांचे इलेक्ट्रिफीकेशन हे कार्बन न्युट्रल कार्यध्येयाकडे पोहोचवणार

वाहनांचे इलेक्ट्रिफीकेशन हे कार्बन न्युट्रल कार्यध्येयाकडे पोहोचण्याच्या FedEx च्या प्रवासातल्या महत्वाच्या क्षेत्रांपैकी एक आहे. २०४० पर्यंत, जगभरातील संपूर्ण FedEx पार्सल आणणे आणि पोहोचवण्याची सेवा ही इलेक्ट्रिक वाहनांच्या माध्यमातून म्हणजेच शून्य उत्सर्जन करण्यात येईल. सध्याच्या अस्तित्वात असलेल्या वाहनांच्या जागी टप्प्याटप्प्याने हे वाहनांचे इलेक्ट्रिफीकेशन ध्येय साध्य केले जाणार आहे. २०२५ पर्यंत FedEx Express च्या जगभरातल्या पार्सल आणणे आणि पोहोचवण्यासाठीची ५०% वाहने इलेक्ट्रिक करण्याचे ध्येय असून २०३० पर्यंत हे प्रमाण वाढवून १००%वर घेऊन जाणार आहे.

इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्याचे धोरण हे त्यांच्या सृष्टीचे आरोग्य जपत ग्राहकांना जागतिक बाजारपेठेशी जोडून घेत भारतात त्यांच्या सेवा आणि सुविधा विस्तारण्याच्या FedEx च्या बांधिलकीशी सुसंगत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fedex express tests electric vehicles in india scsm

Next Story
नेक्सजू मोबिलिटीची ‘बाजिंगा’ इलेक्ट्रिक सायकल सज्ज; सिंगल चार्जवर १०० किमीची रेंज, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी