Luxury Car Sales: जर्मन लग्झरी वाहन उत्पादक कंपनी ऑडी (Audi) ही जगभरात आलिशान गाड्या विकते. जागतिक वाहन बाजारात लग्झरी वाहनांच्या सेगमेंटमध्ये ऑडीचा दबदबा आहे. आता ही कंपनी लग्झरी वाहनं विकते याचा अर्थ या वाहनांची किंमत ही लाखो रुपयांच्या घरात आहे. तरी सुध्दा ही लग्झरी वाहन कंपनी वाहन विक्रीत अव्वल ठरली आहे.

२०२२ मध्ये ऑडी कारच्या विक्रीत २७ टक्क्यांनी वाढ

जर्मन लक्झरी कार उत्पादक ऑडीने नुकतेच आपल्या विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. कंपनीने २०२२ मध्ये एकूण ४,१८७ कार विकल्या, जे २०२१ च्या तुलनेत २७ टक्के अधिक आहे. कंपनीच्या वतीने असे सांगण्यात आले की, त्याच्या विक्रीत वाढ होण्याचे कारण म्हणजे ऑडी क्यू7, ऑडी ए8 एल आणि ऑडी क्यू3 हे तीन नवीन मॉडेल्स आहेत. ऑडी Q7 आणि Audi A8 L या सर्वात जास्त विकल्या जाणार्‍या नवीन कार आहेत.

(हे ही वाचा : १२ लाखाची Mahindra ची ‘ही’ SUV अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करा, पाहा काय आहे ऑफर )

ऑडी इंडिया नव्या वर्षात चांगली कामगिरी करणार

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग ढिल्लन म्हणाले, “अनेक जागतिक आव्हाने जसे की, सेमी-कंडक्टर उपलब्धता, शिपमेंट समस्यांमुळे अडचणी असूनही, २०२२ मध्ये कामगिरीवर खूश आहोत. विक्रीत २७ टक्क्यांहून अधिक दराने वाढ झाली आहे. २०२३ हे ऑडी इंडियासाठी आणखी एक मैलाचा दगड ठरणार आहे. व्हॉल्यूम, कामगिरी आणि इलेक्ट्रिक कारच्या मजबूत पोर्टफोलिओसह, आम्ही आमच्या ग्राहकांना लक्झरी ऑफर करत राहू. येत्या काही महिन्यांत चांगली कामगिरी करण्याचा आम्हाला विश्वास आहे, असे ते म्हणाले.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतातील ऑडी कार

ऑडी इंडियाच्या उत्पादन श्रेणीमध्ये ऑडी ए4, ऑडी ए6, ऑडी ए8 एल, ऑडी क्यू3, ऑडी क्यू5, ऑडी क्यू7, ऑडी क्यू8, ऑडी एस5 स्पोर्टबॅक, ऑडी आरएस 5 स्पोर्टबॅक, ऑडी आरएस क्यू8, ऑडी ई-ट्रॉन 50, ऑडी ई-ट्रॉन यांचा समावेश आहे.