फक्त १० हजार रुपये देऊन घरी घेऊन या Hero Electric Scooter; जाणून घ्या महिन्याला किती रुपयांचा EMI भरावा लागणार

तुम्ही १० हजार रुपये डाउनपेमेंट करून हिरोची इलेक्ट्रिक स्कुटर घरी घेऊन येऊ शकता.

फक्त १० हजार रुपये देऊन घरी घेऊन या Hero Electric Scooter; जाणून घ्या महिन्याला किती रुपयांचा EMI भरावा लागणार
तुम्ही मोजकी डाउनपेमेंट करून हिरोची इलेक्ट्रिक स्कुटर घरी घेऊन येऊ शकता. (heroelectric.in)

भारतामध्ये इलेक्ट्रिक स्कुटरच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. या स्कुटर्सपैकी बहुतांश स्कुटर्स या हिरो कंपनीच्या आहेत. तुम्हालाही नवीन इलेक्ट्रिक स्कुटर विकत घ्यायची असेल तर तुम्ही मोजकी डाउनपेमेंट करून हिरोची इलेक्ट्रिक स्कुटर घरी घेऊन येऊ शकता. यासाठीची संपूर्ण प्रक्रिया आज आपण जाणून घेणार आहोत.

हिरो इलेक्ट्रिक स्कूटरच्या दोन्ही मॉडेल्सच्या किंमती आणि वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, हिरो इलेक्ट्रिक एट्रिया एलएक्सची ​​एक्स-शोरूम किंमत ७१ हजार ६९० रुपये आहे. उत्कृष्ट लुक आणि वैशिष्ट्यांसह या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी रेंज ८५ किमी पर्यंत आहे आणि याची टॉप स्पीड २५ किमी प्रतितास आहे. म्हणजेच ही कमी गतीची स्कूटर आहे. तसेच, हिरो इलेक्ट्रिक फ्लॅश एलएक्सची ​​किंमत ५९,६४० रुपये आहे आणि ही देखील एक लो स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे. त्याची बॅटरी रेंज एका चार्जवर ८५ किमी पर्यंत आहे आणि तिचा टॉप स्पीड २५ किमी प्रतितास आहे.

Traffic Rules : बाईक चालवताना स्लीपर घातल्यास भरावा लागेल दंड; वाहतुकीचे ‘हे’ नियम तुम्हाला माहित आहेत का?

जर तुम्हाला हिरो इलेक्ट्रिक एट्रिया एलएक्स विकत घ्यायची असेल तर केवळ १० हजार रुपये डाउनपेमेंट करून तुम्ही ही स्कुटर घरी घेऊन येऊ शकता. सध्या याची किंमत ७१,६९० रुपये आहे. १० हजार रुपये डाउनपेमेंट केल्यानंतर, तुम्हाला दोन वर्षांसाठी ८% व्याजदराने ६१,६९० रुपये कर्ज मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला पुढील २४ महिन्यांसाठी प्रतिमाह सुमारे २,७९० रुपये ईएमआय म्हणून भरावे लागतील.

जर तुम्हाला हिरो इलेक्ट्रिक फ्लॅश एलएक्स विकत घ्यायची असेल तर केवळ १० हजार रुपये डाउनपेमेंट करावे लागेल. या स्कूटर मॉडेलची एक्स-शोरूम किंमत ५९,६४० रुपये आहे. यासाठी तुम्हाला दोन वर्षांसाठी ४९,६४० रुपये कर्ज मिळेल आणि व्याजदर ८% असेल. पुढील दोन वर्षांसाठी दरमहा २,२४५ रुपये ईएमआय म्हणून भरावे लागतील.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Ola S1 Scooter: केवळ ४९९ रुपयांमध्ये बूक करा ओलाची नवी इलेक्ट्रिक स्कूटर; किंमत एक लाखाहूनही कमी, पाहा फिचर्स
फोटो गॅलरी