MG Hector SUV Price : ऑटोमोबाईल मार्केटमधील ट्रेंड ग्राहकांच्या गरजेनुसार हळूहळू बदलताना दिसत आहे. त्यामुळे मार्केटमध्ये एसयूव्हीची मागणी झपाट्याने वाढली आहे. एसयूव्ही गाडीची दिवसेंदिवस मागणी वाढल्याने कार निर्मात्या कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. पण, विविध ऑफर्सच्या रूपात ग्राहकांना या स्पर्धेचा फायदा होत आहे. तर आज आपण सर्वांत बेस्ट एसयूव्हीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याचा निल्सेनआयक्यू कॉस्ट ऑफ ओनरशिप सर्व्हे- डिसेंबर २०२३ नुसार मॉडेलचा देखभाल खर्च दरमहा केवळ ५०० रुपये आहे.

२०१९ मध्ये लाँच झालेली हेक्टर (Hector) ही ‘एमजी मोटर’ची भारतातील पहिली एसयूव्ही कार आहे. ही कार ५ सीटर एसयूव्ही म्हणून बाजारात आणली. नंतर सहा व मग सात सीटरची एसयूव्हीसुद्धा लाँच करण्यात आली. हेक्टर एसयूव्ही पाच सीटरची किंमत १३,९९,८०० ते २२,५६,८०० रुपये (एक्स-शोरूम)दरम्यान, हेक्टर प्लस एसयूव्ही सहा सीटरची किंमत १७,४९,८०० ते २३,४०,८०० रुपये तर हेक्टर प्लस सात सीटरची किंमत १७,४९,८०० ते २३,१९,८०० रुपये (एक्स-शोरूम) आहे.

हेक्टर रेंजमध्ये १.५ लिटर टर्बो पेट्रोल आणि २.० लिटर डिझेल, असे इंजिनाचे दोन पर्याय दिले आहेत. टर्बो पेट्रोल युनिट 143PS कमाल पॉवर आणि 250Nm पीक टॉर्क जनरेट करते. डिझेल युनिट जास्तीत जास्त 170PS पॉवर आणि 350Nm पीक टॉर्क जनरेट करते. ट्रान्स्मिशन पर्यायांमध्ये टर्बो पेट्रोल इंजिनसह ६स्पीड एमटी, सीव्हीटी व डिझेल इंजिनासह ६ स्पीड एमटी यांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७५ हून अधिक कनेक्टेड कार फीचर्स…

एमजी हेक्टरच्या फीचर्सपैकी १४.० इंच पोर्ट्रेट टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट डिस्प्ले, पॉवर-ॲडजस्टेबल, हवेशीर फ्रंट सीट्स, पॉवर टेलगेट, ७५ हून अधिक कनेक्टेड कार फीचर्स, ड्युअल-पेन पॅनोरमिक सनरूफ व ADAS लेव्हल २ आहेत. एमजी हेक्टर आज महिंद्रा स्कॉर्पिओ, महिंद्रा XUV700, टाटा हॅरियर, टाटा सफारी, ह्युंदाई अल्काझार व जीप कंपास यांच्या पसंतीस टक्कर देते.