Hero MotoCorp कंपनी देशातील सर्वात मोठी Two Wheeler कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल्स लॉन्च करतच असते. हिरो कंपनीबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. आता हिरो कंपनीने व्यवस्थापनमध्ये काही बदल करण्याचे निर्णय घेतले आहेत. कंपनीने ३० मार्च २०२३ म्हणजेच काल गुरुवारी निरंजन गुप्ता यांची कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदा (CEO) साठी घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निरंजन गुप्ता हे १ मे २०२३ पासून विद्यमान सीईओ डॉ. पवन मुंजाल यांची जागा घेणार आहेत. म्हणजेच गुप्ता हे १ मे २०२३ रोजी सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. तसेच कंपनीने सांगितले की डॉ. पवन मुंजाल हे कंपनीचे कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आणि पूर्णवेळ संचालक असतील. तसेच नवीन CFO चे नाव नंतर जाहीर करणार असल्याचे कंपनीने सांगितले.

गुप्ता यांच्या सीईओ पदावर भाष्य करताना, हिरो मोटोकॉर्पचे कार्यकारी अध्यक्ष आणि पूर्णवेळ संचालक डॉ. पवन मुंजाल म्हणाले, सीईओ पदासाठी त्यांची झालेली निवड ही आम्ही कंपनीमध्ये सुरु केलेल्या मजबूत उत्तराधिकार नियोजन प्रक्रियेची साक्ष आहे.

हेही वाचा : १ एप्रिलपासून बंद होणार ‘या’ १७ कार, मारुती, होंडा, महिंद्रा कंपन्यांचा समावेश, पाहा तुमची कार आहे काय यात

निरंजन गुप्ता सध्या कंपनीच्या मुख्य वित्त अधिकारी, प्रमुख – स्ट्रॅटेजी आणि M&A म्हणून काम करत आहेत. OEM च्या मते, गेल्या ६ वर्षांमध्ये निरंजन यांनी अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात कंपनीचे आर्थिक स्थिती सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हार्ले डेव्हिडसन आणि झिरो मोटरसायकल यांसारख्या जागतिक ब्रँडसह महत्त्वपूर्ण भागीदारी करण्यातही निरंजन गुप्ता यांनी महत्वाची भूमिका बजवाली आहे.

निरंजन गुप्ता होणार हीरो मोटोकॉर्पचे नवीन सीईओ(image credit- financial expres)

निरंजन गुप्ता यांना २५ वर्षांपेक्षा जास्तीचा अनुभव आहे. ते वित्त, विलीनीकरण आणि अधिग्रहण, धातू आणि खाणकाम, पुरवठा साखळी आणि ग्राहकोपयोगी वस्तू आणि ऑटोमोबाईल्स यासारख्या व्यवसाय क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भूमिकांमध्ये काम करत आहेत. गुप्ता यांनी एथर एनर्जी, एचएमसी एमएम ऑटो आणि एचएमसीएल कोलंबियाच्या बोर्डवर संचालक म्हणूनही काम केले आहे. Hero MotoCorp मध्ये काम करण्याआधी त्यांनी वेदांता येथे तीन वर्षे आणि युनिलिव्हरमध्ये विविध जागतिक भूमिकांमध्ये २० वर्षे काम केले आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hero motocorp board appointes new ceo niranjan gupta 1 may 2023 dr pawan munjal tmb 01
First published on: 31-03-2023 at 11:03 IST