Hero MotoCorp ने नुकतीच देशात Karizma XMR 210 नवीन अवतारात देशात दाखल केली आहे. ही बाईक ग्राहकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. Karizma XMR ला आतापर्यंत १३,६८८ बुकिंग मिळाले असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. या बाईकची वाढती मागणी पाहता कंपनीने डीलरशिपपर्यंत गाड्या पाठवण्यास सुरुवात केली असून आता ग्राहकांना बाईकची डिलिव्हरी या महिन्याच्या अखेरीसपर्यंत होण्याची शक्यता आहे.

Karizma XMR 210 या बाईकमध्ये काय आहे खास?

Hero MotoCorp ने अलीकडेच Karizma XMR लाँच केले आहे. आकर्षक डिझाईन, चांगले फीचर्स आणि चांगली कामगिरी यामुळे बाईकला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. नवीन Karizma XMR नवीन लिक्विड-कूल्ड, २१०cc, सिंगल-सिलेंडर इंजिनसह येते जे २५.५bhp आणि २०.४Nm पॉवर निर्माण करते. इंजिन ६-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे, जे स्लिप आणि असिस्ट क्लचसह येते. नवीन स्टील ट्रेलीस फ्रेमवर आधारित असून नवीन बाईकमध्ये टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क आणि मागील बाजूस प्रीलोड अॅडजस्टेबल मोनोशॉक आहे.

Pune Porsche car accident What is remand home accused at remand home
बालसुधारगृह म्हणजे काय? पुणे पोर्श अपघातातील आरोपीचा दिनक्रम कसा असेल?
Sonakshi Pandey secured offers from Google, Amazon and Microsoft
दोन पानी रेझ्युमेने मिळवून दिली Google अन् Microsoft कंपनीत नोकरीची संधी! पाहा सोनाक्षी पांड्येचा प्रवास
sonali tanpure post
“पोर्श कार अपघातानंतर ‘त्या’ गोष्टी पुन्हा आठवल्या”; आमदार प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीची पोस्ट चर्चेत!
girl from andheri robbed by throwing inflammable
कल्याणमध्ये अंधेरीतील तरूणीवर ज्वलनशील पदार्थ टाकून लुटले
Hajj pilgrims, app, devotees,
हज यात्रेकरूंच्या समस्या निवारणासाठी ॲपची निर्मिती; नव्या उपक्रमाने भाविकांना दिलासा
Marathi Theatre Classic, All the Best play, 50th show within three months, All the Best play Return, all the best return with new actors, marathi theatre, Shivaji mandir, theatre, marathi plays,
नव्या संचातील ‘ऑल द बेस्ट’चा ५० वा प्रयोग, तीन महिन्यांत ५० व्या प्रयोगापर्यंत वाटचाल
hybrid fund, hybrid fund types, share market, stock market, conservative hybrid fund, aggressive hybrid fund, sebi, investment in stock market, new investor in stock market, pros and cons of hybrid fund,
‘हायब्रिड’च्या निमित्ताने …
Chillar Party, Chillar Party Celebration Twelfth Anniversary, Special Children Film Screening , Chillar Party with Special Children Film Screening, Special Children Film Screening in Kolhapur, Kolhapur news, children special film Kolhapur, Kolhapur news, Chillar Party news, marathi news,
चिल्लर पार्टीचा बारावा वर्धापन दिन दुर्गम वाड्यावस्त्यांतील मुलांसोबत

(हे ही वाचा : बाकी कंपन्यांचे उडाले होश, E20 पेट्रोलवरही धावणारी Yamaha ची नवी स्कूटर देशात दाखल, किंमत फक्त… )

Karizma XMR 210 वैशिष्ट्ये

ब्रेकिंग सिस्टीमसाठी, मोटरसायकलमध्ये ३०० मिमी फ्रंट आणि २४० मिमी मागील डिस्क तसेच ड्युअल-चॅनल एबीएस मानक आहेत. हे आयकॉनिक यलो, मॅट फँटम ब्लॅक आणि टर्बो रेड या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. नवीन Karizma XMR सेगमेंट-फर्स्ट अॅडजस्टेबल विंडशील्ड, इंटेलिजेंट इलुमिनेशन हेडलॅम्प आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनने सुसज्ज आहे.

किमतीत वाढ

या बाईकचे बुकिंग २९ ऑगस्ट २०२३ रोजी सुरू झाले आणि ३० सप्टेंबर २०२३ रोजी बंद झाले. त्यानंतर, Karizma XMR 210 बाईक ७,००० रुपयांनी महाग झाली आणि आता ती १,७९,९०० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) च्या किमतीत उपलब्ध आहे.