Best Selling Bike in India: नवनवीन डिझाईन आणि फीचर्स असलेल्या कितीही बाईक्स बाजारात आल्या, तरी काही बाईक्स अशा आहेत ज्या जुन्या झाल्यानंतरही बाजारपेठेत अधिराज्य गाजवतात. लोकांना या बाईक्स अनेक कारणांमुळे आवडतात. बऱ्याच लोकांना त्यांच्या जुन्या डिझाइनमुळे बाईक्स आवडतात, तर अनेकांना त्यांच्या मायलेज आणि कमी किमतीमुळे त्या विकत घ्यायला आवडतात. भारतीय बाजारपेठेतील अशीच एक बाईक हीरो स्प्लेंडर प्लस आहे, जिची लोकप्रियता गेल्या २२ वर्षांपासून कायम आहे. Hero Splendor Plus दर महिन्याला विक्रीत अव्वल स्थानावर आहे आणि फक्त १००cc इंजिन आणि साधी रचना असूनही, या बाईकची विक्री धडाक्यात होते.

प्रसिद्ध बाईक उत्पादक कंपनी Hero MotoCorp च्या Hero Splendor या बाईकचा दबदबा पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत दिसून आला आहे. हिरो कंपनीची ही बाईक गेल्या महिन्यातच सर्वाधिक विकली जाणारी बाईक ठरली आहे. या बाईकने फेब्रुवारी २०२४ मधील विक्रीच्या बाबतीत TVS Raider, Bajaj Pulsar आणि TVS Apache सारख्या उत्तम बाइक्सना मागे टाकले आहे.

(हे ही वाचा : मारुतीच्या बलेनोसह फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या ‘या’ कारमध्ये आढळला दोष; १६ हजार कार माघारी बोलविल्या, ‘हे’ आहे कारण… )

फेब्रुवारी २०२४ मध्ये, Hero Splendor २ लाख ७७ हजार ९३९ युनिट्सच्या विक्रीसह पहिल्या स्थानावर आहे, तर Honda Shine १ लाख ४२ हजार ७६३ युनिट्सच्या विक्रीसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर बजाज पल्सर १ लाख १२ हजार ५४४ विक्रीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. हिरोच्या एचएफ डिलक्सचीही उत्तम विक्री होती. गेल्या महिन्यात या बाईकच्या एकूण ७६ हजार १३८ युनिट्सची विक्री झाली होती. TVS Raider बद्दल बोलायचे झाले तर, या बाईकने ४२ हजार ०६३ युनिट्स विकल्या, तर Apache ने ३४ हजार ५९३ युनिट्स विकल्या.

हिरो स्प्लेंडर जबरदस्त मायलेज

लोकांना हिरो स्प्लेंडर त्याच्या मायलेजमुळे सर्वाधिक आवडते. ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये ६०-६५ किलोमीटर मायलेज देते. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने या बाइकमध्ये ९७.२cc सिलेंडर एअर कूल्ड इंजिन दिले आहे जे जास्तीत जास्त ८.०२PS पॉवर आणि ८.०५Nm कमाल टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये ४ स्पीड गिअरबॉक्स आहे.