देशातील दुचाकी क्षेत्रातील स्कूटरला मोठी मागणी आहेत. यात मायलेज स्कूटर ते प्रीमियम स्कूटर देखील सहज उपलब्ध आहेत. जर तुम्ही स्वतःसाठी स्टायलिश आणि लांब मायलेज देणारी स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला १०० सीसी सेगमेंटच्या दोन लोकप्रिय स्कूटरची संपूर्ण माहिती येथे सांगणार आहोत. या तुलनेत, आज आमच्याकडे Honda Activa 6G आणि Hero Pleasure Plus Xtec आहेत. यामध्ये तुम्ही या दोन्ही गाड्यांची किंमत ते वैशिष्ट्यांपर्यंत संपूर्ण तपशील जाणून घेऊ शकाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Honda Activa 6G: होंडा अ‍ॅक्टिव्हा 64G ही त्यांच्या कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे, जी कंपनीने दोन प्रकारांसह बाजारात लॉन्च केली आहे. स्कूटरमध्ये १०९.५१ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे. जे ७.७९ पीएस पॉवर आणि ८.७९ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टममध्ये, कंपनीने त्याच्या दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेकचे संयोजन दिले आहे. तसेच अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर बसवले आहेत. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही अ‍ॅक्टिव्हा ६० किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. होंडा अ‍ॅक्टिव्हाची सुरुवातीची किंमत ७०,५९९ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. टॉप व्हेरियंटवर ७२,३४५ रुपयांपर्यंत जाते.

केंद्र सरकारच्या पीएलआय योजनेसाठी टाटा, महिंद्रा, ह्युंदाईची निवड, यादीत मारुती कंपनी नाही कारण…

Hero Pleasure Plus: हीरो प्लेजर प्लस ही एक आकर्षक डिझाइन केलेली स्कूटर आहे जी कंपनीने Xtec अवतारमध्ये नुकतीच सादर केली आहे आणि कंपनीने या स्कूटरचे चार प्रकार बाजारात आणले आहेत. या स्कूटरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने यामध्ये ११०.९ सीसी सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे जे जास्तीत जास्त ८.१ पीएस पॉवर आणि ८.७ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल सांगायचे तर, कंपनीने त्याच्या पुढील आणि मागील चाकांमध्ये ड्रम ब्रेक लावले आहेत, ज्यामध्ये अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. मायलेजबाबत, कंपनीचा दावा आहे की हा हिरो प्लेजर प्लस ६३ किमीचा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. हिरो प्लेजर प्लसची सुरुवातीची किंमत ६२,२२० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी टॉप व्हेरियंटवर ७१,४२० रुपयांपर्यंत जाते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honda activa 6g vs hero pleasure plus know price mileage and style rmt
First published on: 12-02-2022 at 14:07 IST