Best Selling Scooter July 2023: भारतीय ग्राहकांनी सुरुवातीपासूनच स्कूटरला त्यांची पसंती दर्शवली आहे. त्यामुळे देशातील अनेक दुचाकी उत्पादक कंपन्यांनी स्कूटरप्रेमी ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून अनेक नवनवीन स्कूटर लाँच केल्या आहेत. जुलै महिन्यात भारतीय ग्राहकांनी सर्वाधिक खरेदी केलेल्या स्कूटर्सची यादी नुकतीच समोर आली आहे. यामध्ये होंडा अॅक्टिव्हाने (Honda Activa) पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे.
भारतीय ऑटोमोबाईल उद्योगात स्कूटर आणि बाईक्सचे मोठे योगदान आहे. हिरो स्प्लेंडरला बाईक सेगमेंटमध्ये खूप पसंती दिली जाते आणि ती सर्वाधिक विकली जाणारी बाईक आहे. त्याच वेळी, होंडा अॅक्टिव्हा स्कूटर विभागात वर्चस्व गाजवत आहे. Honda Activa ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे.
जपानी ब्रँडने जुलै महिन्यात Activa च्या १,३५,३२७ युनिट्सची विक्री केली आहे, जी गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत ३७ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये २,१३,८०७ मोटारींची विक्री झाली होती. दुसरीकडे, जर आपण या वर्षीच्या जून महिन्याच्या विक्रीची तुलना केली तर जुलैमधील विक्रीत ३.४४ टक्क्यांची उडी आहे. जून २०२३ मध्ये एकूण १,३०,८३० युनिट्सची विक्री झाली.
(हे ही वाचा : Honda City पाहतच राहिली, ६.५१ लाखाच्या मारुतीच्या कारची धडाक्यात विक्री, खरेदीसाठी शोरुम्ससमोर मोठी गर्दी )
Honda Activa किंमत
Honda Activa ची किंमत ७५,३४७ रुपयांपासून सुरू होते आणि ८१,३४८ रुपयांपर्यंत जाते. ती टीव्हीएस ज्युपिटर, सुझुकी ऍक्सेस, यामाहा रे झेडआर आणि हिरो प्लेजर प्लस सारख्या स्कूटरशी स्पर्धा करते.