मोटार वाहन चालवणाऱ्या लोकांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स एक महत्त्वाचं कागदपत्र आहे. जर लायसन्स नसेल आणि पकडले गेलात तर १० हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. दस्तऐवजात कोणत्याही प्रकारची चूक आढळून आल्यास तुम्ही अडचणी येऊ शकतात. यासाठी तुम्ही तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स सुरक्षित आणि योग्य माहितीसह ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या पत्त्यामध्ये काही चूक झाली असेल आणि तुम्हाला ती दुरुस्त करायची असेल, तर तुम्ही ती सहज बदलू शकता. यासाठी तुम्हाला आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही, हे काम घरी बसून करता येते. मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत, आरटीओ विभागाने लोकांना त्यांचा पत्ता दुरुस्त करण्याची परवानगी दिली आहे. ज्या व्यक्तींनी त्यांचे निवासस्थान कायमचे किंवा कमीत कमी काही कालावधीसाठी स्थलांतरित केले आहे. त्यांनी त्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्समध्ये देखील बदल करणे आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्सवर तुमचा पत्ता बदलण्यासाठी दोन पर्याय दिले आहेत. हा पत्ता तुम्ही आरटीओ कार्यालयात जाऊन किंवा घरबसल्या ऑनलाइन बदलू शकता. घरबसल्या असा पत्ता बदला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.आता तुमचे राज्य निवडा, त्यानंतर Apply Online वर क्लिक करा आणि नंतर “Services on Driving License” पर्याय निवडा.डायलॉग बॉक्समधील सूचना काळजीपूर्वक वाचा आणि Continue बटणावर क्लिक करून पुढे जा.जुना ड्रायव्हिंग लायसन्स नंबर, जन्मतारीख, राज्य, RTO इत्यादी तपशील काळजीपूर्वक भरा आणि Proceed बटणावर टॅप करा.आता तुम्हाला सर्व बॉक्स भरावे लागतील आणि तुमचा कायमचा पत्ता सत्यापित करण्यासाठी "पुढे जा" बटणावर क्लिक करा.आता सूचीमधून ड्रायव्हिंग लायसन्स सर्व्हिसमध्ये बदल निवडा.नवीन ड्रायव्हिंग लायसन्समध्ये तुम्हाला जो पत्ता बदलायचा आहे तो भरा आणि कॅप्चा कोड टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.दुसऱ्या पानावर तुम्हाला अॅप्लिकेशन नंबर मिळेल, तुम्ही तो पुढील वापरासाठी प्रिंट करू शकता. त्यानंतर Next बटणावर क्लिक करा.आता येथे तुम्हाला जुन्या डीएलची प्रत आणि पत्ता पुरावा अपलोड करावा लागेल. त्यानंतर शुल्क ऑनलाइन भरावे लागेल.अर्ज क्रमांक मिळाल्यानंतर फाइल निवडा आणि दस्तऐवज अपलोड करा. त्यानंतर अपलोड दस्तऐवज तपासा. पुढील बटणावर टॅप करा आणि पैसे भरा. टेस्ला यंदा नवं मॉडेल लॉन्च करणार नाही; २०२१ या वर्षात विक्रमी कमाई करूनही घेतला निर्णय, कारण… या कागदपत्रांची आवश्यकता फॉर्म ३३ मध्ये अर्ज करण्यासाठी, तुमच्याकडे नोंदणी प्रमाणपत्र, नवीन पत्त्याचा पुरावा, वैध विमा प्रमाणपत्र, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, फायनान्सरचे ना हरकत प्रमाणपत्र (हायपोथेकेशनच्या बाबतीत), पॅन कार्ड किंवा फॉर्म ६० आणि फॉर्म ६१(जसे लागू असेल) असणे आवश्यक आहे. चेसिस आणि इंजिन पेन्सिल प्रिंटची प्रमाणित प्रत, ओळखण्यासाठी मालकाची स्वाक्षरी असणं आवश्यक आहे.