पेट्रोलच्या वाढत्या किंमती पाहता गेल्या काही दिवसात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. त्यामुळे कंपन्यांनी इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्कूटर तयार करण्यावर जोर दिला आहे. दुसरीकडे पेट्रोलच्या वाढत्या किंमती पाहता आधीच बाइक आणि स्कूटर घेतलेले ग्राहक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक बाइक असती तर बरं झालं असतं, असं त्यांना वाटत आहे. नविन इलेक्ट्रिक बाइक घेणं परवडणारं नाही. त्यामुळे आता सध्याची बाइक किंवा स्कूटर इलेक्ट्रिकमध्ये बदलण्याचा पर्याय समोर आला आहे. मात्र यासाठी तुम्हाला थोडे पैसे मोजावे लागणार आहेत. असं असलं तरी महागडं पेट्रोल खरेदी करण्यापासून सुटका होणार आहे. किट बसवणाऱ्या कंपनीचा दावा आहे की, बाइक इलेक्ट्रिकमध्ये बदलल्यानंतर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर १५१ किमीपर्यंतचे अंतर कापू शकते.

दुचाकीचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्यासाठी, तुम्हाला ईव्ही वाहने बनवणाऱ्या कंपनीशी संपर्क साधावा लागेल. Bounce, Zuink आणि GoGoA1 सारख्या काही कंपन्या यावेळी खूप लोकप्रिय आहेत. या कंपन्या तुमच्या बाईकचा गियर बॉक्स आणि इंजिन बदलतील आणि त्यात इलेक्ट्रिक किट रिट्रोफिटिंग करतील. त्यानंतर तुमची पेट्रोल बाईक पूर्णपणे इलेक्ट्रिक बाईक होईल. एका माहितीनुसार, मोटरसायकलच्या तुलनेत पेट्रोल स्कूटरला इलेक्ट्रिकमध्ये बदलण्याचा खर्च कमी आहे. याचे कारण स्कूटरमध्ये भरपूर बूट स्पेस असते. हे रूपांतरण खर्च कमी करते. साधारणपणे आरटीओ मान्यताप्राप्त रेट्रोफिट इलेक्ट्रिक मोटर किटची किंमत १५ ते २० हजार रुपयांपासून सुरू होते. पण ही गुंतवणूक एकदाच करावी लागते. बर्‍याच बॅटरीची ३ वर्षांची वॉरंटी असते. तीन वर्षातील पेट्रोलचा खर्च पाहता बॅटरीची किंमत आरामात वसूल होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इलेक्ट्रिक किट रेट्रोफिट्स आता सहज उपलब्ध आहेत. गुगलवर सर्च करून ऑनलाइन ऑर्डरही करता येते. त्याच वेळी, Zuink चे इलेक्ट्रिक किट स्वॅप करण्यायोग्य बॅटरीसह येते. २७ हजार रुपयांत हे किट घेऊन तुम्ही ते तुमच्या बाईकमध्ये बसवू शकता. तर Gogoe-1 च्या इलेक्ट्रिक किटची किंमत ३५ हजार रुपये आहे. हे तुमच्या स्प्लेंडर बाइकला इलेक्ट्रिक बाइकमध्ये रूपांतरित करू शकते. मात्र, यामध्ये बॅटरीची किंमत आणि जीएसटी वेगळा भरावा लागणार आहे. पण कंपनीचा दावा आहे की, किट पूर्ण चार्ज केल्यावर १५१ किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते.