आपल्या घराखाली स्वतःची एकतरी गाडी असावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते स्वप्न पूर्ण झालं कि त्या गाडीमधून हव्या त्या ठिकाणी जाण्यासाठी आपण सज्ज होतो. मात्र अनेकदा लांबचा प्रवास केल्यानंतर किंवा अगदी एक दोन वर्षांतच नवीन गाडी जुनी वाटू लागते. असे होण्यामागे ही चार कारणे असू शकतात.
त्यामुळे नवीन गाडीची काळजी कशी कशी घ्यायची, तिचा मेंटेनेंस कसा करावा आणि कोणत्या गोष्टी करू नये याच्या काही सोप्या टिप्स पाहा.

नवीन गाडी घेतल्यानंतर कोणती काळजी घ्यावी :

१. लांबचे प्रवास ठराविक काळाने करणे

नव्या कोऱ्या गाडीच्या इंजिनला सुरळीत काम करण्यासाठी थोडा वेळ लागतो. गाडीचे इंजिन व्यवस्थित ट्यून होण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा. त्यामुळे गाडी घेतल्या-घेतल्या काही काळासाठी कोणत्याही लांब पल्ल्याच्या प्रवासाला जाणे शक्यतो टाळावे. गाडीचे पहिले सर्व्हिसिंग झाल्यानंतर थोड्या काळाने गाडी मोठ्या प्रवासासाठी तयार होऊ शकते. गाडीचा परफॉर्मन्स अधिक चांगला राहण्यासाठी या टीपचा वापर करा.

हेही वाचा : Electric vehicle tips : या गाड्यांना कधीच करू नका १०० टक्के चार्ज! पाहा चार महत्त्वाच्या चार्जिंग टिप्स

२. गाडीत भरपूर सामान भरू नका

गाडीमध्ये गरजेपेक्षा अधिक सामान भरणे गाडीच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते. वाहनामध्ये अतिरिक्त वजन आल्यास गाडी अधिक प्रमाणात इंधनाचा वापर करते. तसेच वाहन सुरळीत काम करण्यासाठी इंजिनदेखील अधिक ताण घेते. असे होऊ नये यासाठी विचार करून, मोजके सामान आपल्या गाडीमध्ये भरावे.

३. इतर जड वाहनांना टो करू नका

नव्या कोऱ्या गाडीने कधीही इतर वाहनांना टो करू नये. तुमच्या गाडीपेक्षा जर समोरची गाडी अधिक वजनाची असेल तर त्याचा परिणाम तुमच्या वाहनावर होतो. तसेच, कोणत्याही वाहनास टो करताना इंजिनवर अतिरिक्त ताण येतो. इंजिन अधिक ऊर्जेचा आणि इंधनाचा वापर करते. त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या वाहनाच्या आरोग्यावर होतो. जर तुम्हाला कधी दुसऱ्या गाडीला टो देण्याची वेळ आलीच तरी थोड्या अंतरापर्यंत मदत करावी.

हेही वाचा : Traffic tips : शहरातील रोजच्या ट्रॅफिकचा त्रास कसा टाळावा? पाहा या सोप्या ट्रिक्स

४. पाण्यातून गाडी चालवू नये

पाणी कोणत्याही गाडीची स्थिती लवकर खराब करत असते. त्यामुळे पावसाळ्यात, पाणी साचलेल्या भागांमधून आपले वाहन नेणे टाळावे. पाण्यामुळे, गाडीतील वायर्स, इंजिन, बॅटरी किंवा गाडीतील इतर कोणत्याही फीचर्स सहज खराब करू शकते. परिणामी तुमच्या गाडीचे आयुष्य कमी होऊ शकते. त्यामुळे शक्यतो भरपूर पाऊस असल्यास, पाणी साचले असल्यास गाडीचा वापर टाळावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरील टिप्सचा वापर करून तुम्ही तुमच्या नवीन गाडीची काळजी घेऊ शकता. या टिप्सची माहिती न्यूज १८ डॉट कॉमच्या एका लेखावरून मिळवलेली आहे.