ऑफिस, कामावर जाण्यासाठी नागरिक बस, रेल्वे, मेट्रो यांसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. तर अनेक जण स्वतःच्या दुचाकी किंवा चारचाकीचा वापर करतात. मात्र, सकाळच्या किंवा रात्री घरी येण्याच्या वेळेत रस्त्यांवर सर्वप्रकारच्या वाहनांची प्रचंड कोंडी आपल्याला दररोज पाहायला मिळते. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, पुणे यांसारख्या शहरांमध्ये तर व्यक्ती तासनतास अडकून राहते.

वाहनांची वाढणारी संख्या, अरुंद रस्ते, रस्त्यांवरील विविध कामे यांसारख्या वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्याला प्रचंड प्रमाणात वाहतुकीची कोंडी, ट्रॅफिक पाहायला मिळतो. जे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात, त्यांना या कोंडीतून मार्ग काढण्याचा किंवा असा ट्रॅफिक चुकवण्यासाठी विशेष पर्याय नसतो. मात्र, तुमच्याकडे स्वतःचे वाहन असल्यास भयंकर ट्रॅफिक टाळण्यासाठी पुढील सोप्या टिप्सचा वापर करू शकता.

Top 10 worst cities in Asia for traffic
पुणेकरांचा ट्रॅफिकमुळे ‘एवढा’ वेळ जातो वाया! वाहतूक कोंडीत आशियातील टॉप १० शहरात पुण्याचा समावेश
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
traffic jam on pune Bengaluru highway
पुणे – बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या रांगाच रांगा
traffic e-challan
ई-चलन घोटाळ्यापासून सावध रहा! ट्रॅफिक चलनच्या नावाखाली होतेय फसवणूक, कसे टाळावे?
vehicle dragging police
संतापजनक! दोन वाहतूक पोलिसांना कारच्या बोनेटवरून फरफटत नेलं; दिल्लीतील घटना
Petrol And Diesel Rates In Marathi
Petrol Diesel Rates : महाराष्ट्रात कमी झाले का पेट्रोल-डिझेलचे दर? तुमच्या शहरांत काय आहे इंधनाची किंमत? जाणून घ्या
Shocking video : A rickshaw caught fire due to firecrackers
धक्कादायक! फटाक्यामुळे धावत्या रिक्षाला लागली भररस्त्यात आग, संभाजीनगरचा VIDEO होतोय व्हायरल
On Saturday evening there was huge traffic jam problem in Nalasopara
सणासुदीला नालासोपाऱ्यात प्रचंड वाहतूक कोंडी

हेही वाचा : Car tips : सेकंड हॅण्ड गाडी विकत घेताय? मग कायम लक्षात ठेवा या पाच टिप्स….

वाहतूक कोंडी टाळण्याच्या पाच टिप्स

१. वाहतूक कोंडीबद्दल बातम्या पाहणे

घरातून बाहेर पडण्यापूर्वी सर्वप्रथम वाहतुकीबद्दलच्या बातम्या अवश्य पाहाव्या. यामुळे जर कुठे एखादी दुर्घटना घडली असल्यास किंवा कोणत्याही विशेष कारणांमुळे ट्रॅफिक जॅम असल्यास त्याची तुम्हाला माहिती मिळेल. तसेच पर्यायी रस्त्यांसाठी कोणते मार्ग दिले आहेत, याचीही तुम्हाला कल्पना येईल. अशा बातम्या मिळवण्यासाठी तुम्ही सोशल मीडियावरील ट्रॅफिक वाहतुकीच्या वा वाहतूक पोलिसांच्या अधिकृत अकाउंटला फॉलो करू शकता.

२. विविध रस्त्यांची माहिती घेणे

तुम्हाला एखाद्या ठिकाणी वेळेत पोहोचायचे असल्यास, पर्यायी मार्गांचीदेखील माहिती घ्यावी. यामुळे तुम्हाला जर पुढे ट्रॅफिक लागण्याची शक्यता असल्यास, दुसऱ्या पर्यायी मार्गाचा वापर करून, इच्छितस्थळी वेळेवर पोहोचण्यास मदत होऊ शकते. यासाठी आपल्या स्मार्टफोनमध्ये असणाऱ्या मॅप्सचा वापर तुम्ही करू शकता.

३. गर्दीच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे

तुम्हाला जर दररोज ऑफिस ते घर असा प्रवास करायचा असल्यास, ट्रॅफिकच्या वेळांचा विचार करून त्यानुसार घरातून किंवा ऑफिसमधून बाहेर पडावे. उदाहरणार्थ – वाहातून कोंडी जर सकाळी ८ ते ९ दरम्यान होत असेल तर, आठ वाजायच्या आधी घरातून बाहेर पडावे. यामुळे तुमचा प्रवास सुकर होईल आणि दररोजच्या त्या कंटाळवाण्या कोंडीमध्ये अडकण्याची गरज पडणार नाही.

हेही वाचा : Bike tips : वाहन चोरांपासून सावधान! दुचाकी चोरी होऊ नये म्हणून काय करावे? या उपयुक्त टिप्स पाहा

४. ट्रॅफिक ॲपचा वापर करणे

तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सोप्या आणि सोयीच्या झालेल्या आहेत. त्यामुळे अशा ॲपचा वापर करून तुम्हाला लाईव्ह ट्रॅफिकबद्दल माहिती मिळवता येऊ शकते. लाईव्ह ट्रॅफिक मॉनिटरसारख्या ॲपमध्ये कॅमेराच्या साहाय्याने ठराविक ठिकाणाच्या वाहतूक कोंडीबद्दल अचूक माहिती चालकाला समजू शकते.

५. गरज नसल्यास वाहनाचा वापर टाळावा

ज्यांना आपापल्या वाहनांची सवय झालेली असते, ते अगदी सहज चालत जात येण्यासारख्या अंतरासाठीही त्याचा वापर करतात. असे करणे जरी काही प्रमाणात सोईचे वाटत असले, तरी छोट्या प्रमाणातील ट्रॅफिक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अनेकदा वाहन पार्क करण्यासाठीदेखील अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे विनाकारण वाहतूक कोंडीत अडकून राहण्यापेक्षा किंवा पार्किंगसाठी जागेची शोधाशोध करण्यापेक्षा शक्य तिथे चालत जावे. अशा सोप्या टिप्सबद्दल हिंदुस्तान टाइम्सच्या एका लेखातून माहिती मिळते.