Hyderabad E-Prix: हैदराबाद येथे झालेल्या ग्लोबल मोटरस्पोर्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप फॉर्म्युला ई (Hyderabad E-Prix) मध्ये क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, शिखर धवन, दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगातील प्रसिद्ध अभिनेते राम चरण ते श्रुती हासन आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि किशन रेड्डी यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान या सेलिब्रिटींनी चॅम्पियनशिपचा आनंद लुटला, तर सचिन तेंडुलकरने महिंद्राच्या मालकीच्या इटालियन कंपनी Pininfarinaच्या इलेक्ट्रिक हायपरकारमध्येही राइड घेतली.

खरं तर, Pininfarinaने बनवलेली ‘Battista’ ही इलेक्ट्रिक हायपरकार हैदराबाद ई-प्री येथे प्रदर्शित करण्यात आली होती. यादरम्यान सचिन तेंडुलकरने या जबरदस्त हायपरकारमध्ये स्वार होऊन त्याचे जोरदार कौतुक केले. क्रिकेटच्या दिग्गजाने ट्विट केले आणि म्हटले, ‘Pininfarina Battista’ इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) भविष्यातील आहेत का? याचे अचूक उत्तर, हे खूप वेगवान आहे, आॅटोमोबाईल क्षेत्राने काळाचा अवलंब केला आणि भविष्याकडे झेप घेतली. आनंद महिंद्रा आणि त्यांच्या टीमची एक मोठी उपलब्धी आहे, असे सचिन ट्विट करत म्हणाला.

तर सचिन तेंडुलकरच्या ट्विटला उत्तर देताना, महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी लिहिले, “सचिन, तू आम्हाला Battista साठी एक उत्तम टॅगलाइन दिली आहेस.

(हे ही वाचा : ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरला देशात प्रचंड मागणी, १५ दिवसातच तुफान बुकिंग, बनविला रेकॉर्ड, जाणून घ्या… )

Pininfarina Battista इलेक्ट्रिक कार कशी आहे?

Pininfarina Battista ही इटालियन कार डिझाईन फर्म आणि कोचबिल्डर पिनिनफरिना यांनी डिझाइन केली आहे. कंपनीची स्थापना १९३० मध्ये बॅटिस्टा “पिनिन” फॅरिना यांनी केली होती. Battista हे नाव पिनिनफारिनाच्या संस्थापकाच्या नावावरून देण्यात आलेले आहे. २०१९ च्या जिनिव्हा मोटर शोमध्ये या कारचे अनावरण करण्यात आले. हा ब्रँड महिंद्राने १४ डिसेंबर २०१५ रोजी विकत घेतला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या हायपरकारबद्दल बोलायचे झाले तर यात चार वेगवेगळ्या इलेक्ट्रिक मोटर्स देण्यात आल्या आहेत ज्या सर्व चाकांना उर्जा देतात. त्याची इलेक्ट्रिक मोटर संयुक्तपणे १,९००hp पॉवर आणि २,३००Nm टॉर्क जनरेट करते. पिनिनफरिना म्हणते की कार १.८६ सेकंदांपेक्षा कमी वेळेत ०-१०० किमी प्रतितास, १२ सेकंदांपेक्षा कमी वेळेत ०-३०० किमी प्रतितास वेग घेण्यास सक्षम आहे. त्याचा टॉप स्पीड सुमारे ३५० किमी प्रतितास आहे.

बॅटिस्टा १२०kWh बॅटरी पॅकद्वारे समर्थित आहे जे हायपर-EV ला सुमारे ४४६ किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देते. त्याची बॅटरी अवघ्या २५ मिनिटांत २० टक्के ते ८० टक्के चार्ज होते.