Jaguar Land Rover join hands with Tata Tech for digital transformation: टाटा मोटर्सच्या मालकीच्या जग्वार लँड रोव्हरने मंगळवारी त्याच्या डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजीजसोबत करार करण्याची घोषणा केली. जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) च्या औद्योगिक ऑपरेशन्सच्या कार्यकारी संचालक बार्बरा बर्गमेयर यांनी एका निवेदनात ही माहिती दिली आहे.
बार्बरा बर्गमेयर यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, या कराराअंतर्गत, टाटा टेक्नॉलॉजीज JLR चे उत्पादन, लॉजिस्टिक, सप्लाय चेन, फायनान्स आणि परचेसिंग मॉड्युलमध्ये रूपांतर करण्यासाठी अनेक विभागांमधील डेटा आणि माहिती एकाच स्त्रोतामध्ये आणण्यासाठी शेवटपर्यंत काम करेल. पहिल्या टप्प्यात JLR UK च्या मूलभूत उत्पादन सुविधांचा समावेश असेल. इतर जागतिक स्थानांसाठी उपाय नंतर उपलब्ध केले जातील.
(हे ही वाचा: टाटाच्या ‘या’ ६ लाखांच्या कारने Maruti अन् Mahindra ला पछाडलं, लोकांमध्ये आहे तुफान क्रेझ )
पुढील निवेदनात, बार्बरा बर्गामी म्हणाल्या, “टाटा टेक्नॉलॉजीजसोबत भागीदारी केल्याने आम्हाला आमच्या मुख्य एंटरप्राइझ रिसोर्स प्लॅनिंगमध्ये लवकरात लवकर बदल घडवून आणण्यास मदत होईल, ज्यामुळे उपयोगिता वाढेल आणि भविष्यासाठी आवश्यक कार्यक्षमता प्रदान होईल.”
त्याचवेळी, टाटा टेक्नॉलॉजीजचे एमडी आणि सीईओ वॉरेन हॅरिस म्हणाले की, या सहकार्यामुळे JLR ला नाविन्यपूर्ण आणि टिकाऊ वाहने बनविण्यात मदत होईल आणि नवीन युगाच्या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून बाजारपेठेत वेगाने वाढ होईल.