सुपर बाइक्स निर्मितीच्या क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी कावासाकीने kawasaki z900 चे नवे मॉडेल kawasaki z 900 2023 भारतीय बाजारपेठेत लाँच केले आहे. या बाइकची किंमत ८.९३ लाख इतकी ठेवण्यात आली आहे. पूर्वीच्या मॉडलेच्या तुलनेत या नव्या मॉडेलची किंमत ५१ हजार रुपयांनी अधिक आहे. या मिडल वेट स्पोर्ट नेकेड बाईकच्या केवळ रंगांमध्ये पर्याय देण्यात आला आहे. इंजन स्पेसिफिकेशन्समध्ये फारसे बदल नाही. या दुचाकीची स्पर्था ट्रम्पेट स्ट्रीट ट्रिपल, दुकाटी मॉन्स्टर आणि बीएमडब्ल्यू सारख्या दमदार बाइक्सशी होणार आहे.

kawasaki z 900 2023 काय आहे नवीन

नव्या मॉडेलमध्ये काही मोठे बदल नाही. केवळ दोन नवीन कलर ऑपशन्स देण्यात आले आहेत. नव्या मॉडेलमध्ये मेटॅलिक फॅन्टम सिल्व्हर आणि मेटॅलिक कार्बन ग्रे किंवा एबोनी मेटॅलिक मॅट ग्रेफीन स्टिल ग्रे हे रंग पर्याय देण्यात आले आहेत.

(ऑफ रोड ड्राइव्हर्ससाठी आनंदाची बातमी, हार्लेच्या ‘या’ अ‍ॅडव्हेंचर बाइकवर मिळत आहे ४ लाखांची भरघोस सूट)

स्पेसिफिकेशन्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाइकमध्ये पूर्वीप्रमाणेच ९४८ सीसी इनलाइन फोर सिलेंडर लिक्विड कुल इंजन मिळत आहे. बाइक ६ स्पीड गेअरबॉक्स सोबत येते आणि त्यात एक साइड स्लंग एग्झॉस्ट डिझाईन देखील मिळतो. कावासाकी Z900 च्या युरोपियन मॉडेलच्या तुलनेत या नव्या बाइकला नियंत्रित करणे आणि सांभाळणे अधिक सुलभ आहे. कावासाकीची नवीन बाईक ड्युअल-चॅनल एबीएससह येते.

हे आहेत फीचर्स

पूर्वीप्रमाणे बाइकमध्ये एलइडी लाइटींग आहे. दुचाकीत नव्या स्टाइलचा ४.३ इंचचा कलर टीएफटी डॅश आहे. दुचाकीत दोन पावर मोड, फूल आणि लो व्यतिरिक्त चार राइडिंग मोड रेन, रोड, स्पोर्ट आणि राइडर मोड मिळतात. ही सुपरबाईक तीन ट्रॅक्शन कंट्रोल लेवलसह येते.