Kia India Car Company to sell second hand cars. With a warranty of 40 thousand km, customers will get many more facilities | Loksatta

सेकेंड हँड कार खरेदी करण्याचा विचार करताय? आता ‘ही’ कंपनी विकणार सेकंड हँड कार; ४० हजार किंमीची वॉरंटीसह मिळणार बरंच काही

सेकेंड हँड कार खरेदी करण्याचा विचार करताय, मग थोडे थांबा. ही कंपनी आणत आहे तुमच्यासाठी दमदार सेकेंड हँड कार.

सेकेंड हँड कार खरेदी करण्याचा विचार करताय? आता ‘ही’ कंपनी विकणार सेकंड हँड कार; ४० हजार किंमीची वॉरंटीसह मिळणार बरंच काही
किआ इंडिया कंपनी विकणार सेकंड हँड कार.(Photo-financialexpress)

Kia India new CPO: सेकंड हँड कारच्या विक्रीत अलीकडे मोठी वाढ झाली आहे. सध्या बाजारात अशी अनेक अॅप्स आहेत, जी ग्राहकांना सेकंड हँड कार खरेदी-विक्रीसाठी चांगली ऑफर देत आहेत. सेकंड हँड कार मार्केटच्या झपाट्यानं वाढ होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे नवीन वाहनांच्या किमतीत झालेली वाढ. यामुळंच बहुतांश कार खरेदीदार सेकंड हँड वाहनांकडे वळत आहेत. हेच लक्षात घेत आता किआ इंडिया सेकंड हँड कारच्या बिझनेसमध्ये पाऊल टाकणार आहे, अशी घोषणा कंपनीने केली आहे.

व्यवसाय वाढवण्यासाठी कंपनीने या वर्षाच्या अखेरीस ३० विक्री केंद्रे उघडण्याची योजना आखली आहे. याचे नाव ‘किआ सीपीओ’ ठेवले आहे. याद्वारे ग्राहकांना प्री ऑन्ड कारची विक्री, खरेदी किंवा एक्सचेंज करण्याची सुविधा देईल.

कंपनी देणार ‘या’ सुविधा

किआ सीपीओच्या माध्यमातून विक्री होणाऱ्या कारवर २ वर्ष आणि ४० हजार किमी पर्यंत वॉरंटी कव्हरेज आणि ४ पीरियोडिक मेंटेनेंस फ्री मध्ये मिळेल. एक तृतियांशहून जास्त ग्राहक एक्सचेंज द्वारे किआ कार खरेदी करीत असल्यास कंपनीने स्वतः प्री – ऑन्ड कारचा बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहक नवीन कारसाठी कोणत्याही वापरण्यात आलेल्या कारला एक्सचेंज करू शकतात. ते एक सुरक्षित आणि तात्काळ पेमेंट ट्रान्सफर करण्याचा ऑप्शन सोबत एक्सचेंज ग्राहकांसाठी एक संयुक्त पॅकेज्ड डील सुद्धा आणत आहे.

(आणखी वाचा : Second Hand Car खरेदी करण्याचा विचार करताय? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होणार…)

देशातील ‘या’ १४ शहरात आउटलेट आणले

किआ सीपीओ सोबत प्री ऑन्ड कार बाजारात नवीन नियम आणणार आहे. किआ उद्योगमध्ये आवश्यक बदल करून क्रांती करण्याचा प्रयत्न करणार आहे. किआची २०२२ च्या अखेर पर्यंत ३० हून जास्त आउटलेट सोबत सीपीओ व्यवसायला पुढे नेण्याची योजना बनवत आहे. भारतातील १४ शहरात दिल्ली एनसीआर, बंगळुरू, अहमदाबाद, हैदराबाद, चंदीगड, जयपूर, कोचीन, भुवनेश्वर, कोलकाता, अमृतसर, नाशिक, बडोदा, कन्नूर आणि मलप्पूरम् मध्ये १५ आउटलेट आणले आहेत, अशी माहिती किआ इंडियाचे चीफ सेल्स ऑफिसर मायुंग सिक सोहन यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 13:22 IST
Next Story
Second Hand Car खरेदी करण्याचा विचार करताय? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होणार…