New Kia Sonet Gravity Price Features: किआची सर्वात लहान कार Sonet आता नवीन व्हेरिएंटमध्ये बाजारात उपलब्ध होणार आहे. HTK + नंतर आता पहिल्यांदाच किआने सोनेट मॉडेलमध्ये नवीन ‘Gravity’ व्हेरिएंट्स सादर केले आहेत. किआच्या या नव्याकोऱ्या व्हेरिएंटची किंमत, तसेच त्याचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.

किआने नुकतंच Sonet मॉडेलमध्ये नवीन Gravity व्हेरिएंट सादर केलं आहे. दक्षिण कोरियाच्या निर्मात्यांच्या मते, Gravity व्हेरिएंट नवीन ट्रिम प्रिमियम फिचर्ससह ग्राहकांना अधिक व्हॅल्यू ऑफर करते. किआ सोनेटची ही ग्रॅव्हिटी रेंज टर्बो पेट्रोलसह तीन पॉवरट्रेनमध्ये उपलब्ध आहे.

natasha stankovic new songs
हार्दिक पंड्यापासून विभक्त झाल्यावर नताशाने केली पहिल्या प्रोजेक्टची घोषणा; नव्या गाण्यात झळकणार, कृणाल पंड्याच्या कमेंटने वेधलं लक्ष
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
A 30-year-old woman in Thailand died after her manager allegedly refused her sick leave request
Work Pressure : मॅनेजरने सिक लीव्ह नाकारली, ऑफिसमध्ये जाताच विसाव्या मिनिटांत ती कोसळली, कामाच्या अतिताणाचा आणखी एक बळी!
charges on upi payments
‘…तर ७५ टक्के युजर UPI पेमेंट करणं बंद करतील’, ताज्या सर्व्हेमधून समोर आले निष्कर्ष!
Hardik Pandya Met Agastya After Divorce
Hardik Pandya With Agastya : घटस्फोटानंतर हार्दिक पंड्या पहिल्यांदाच भेटला लेकाला, अगस्त्यच्या भेटीचा गोड VIDEO व्हायरल!
boyfriend tries to convince his upset girlfriend on the road
रुसलेल्या गर्लफ्रेंडला मनविण्यासाठी तरुणानं भर रस्त्यात काय केलं पाहा; सगळेच पाहू लागले अन् शेवटी…, VIDEO झाला व्हायरल
artificial intelligence diagnose heart failure
कुतूहल: श्रमता हृदय हे!
Vicky kaushal tauba tauba song video the old age home old ladies danced on the song tauba tauba vicky kaushal
‘तौबा तौबा’ गाण्यावर वृद्धाश्रमातल्या आजीबाईंचा तुफान डान्स; VIDEO पाहून विकी कौशलही भारावला; रिप्लाय एकदा पाहाच

हेही वाचा… सणासुदीत स्वस्तात कार घ्यायचीय? Maruti Suzukiच्या ‘या’ गाड्या झाल्या स्वस्त, किंमत वाचून व्हाल थक्क

किआ सोनेट ग्रॅविटी: इंजिन आणि किंमत (Kia Sonet Gravity: Engine and Price)

किआची सोनेट ग्रॅव्हिटी (Kia Sonet Gravity) 1.2-लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड (NA) पेट्रोल, 1-लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिनसह उपलब्ध आहे. तसेच सोनेट ग्रॅविटी NA 82 bhp आणि 115 Nm टॉर्क देते आणि तसेच या कारमध्ये ५-स्पीड मॅन्युअल गिअर आहेत.

कारमध्ये दोन ट्रान्समिशन आहेत. 118 bhp टर्बोमध्ये 172 Nm टॉर्क आहे, जे 6-स्पीड iMT क्लच मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेलं आहे. तसेच 1.5-लिटर डिझेल 114 bhp आणि 250 Nm टॉर्क निर्माण करते, जे 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते.

हेही वाचा… Royal Enfield प्रेमींसाठी खुशखबर! तुमची आवडती Classic 350 नव्या लूकसह झाली लॉंच; किंमत एकदा पाहाच

Kia Sonet VariantsSonet HTK Plus PricesSonet Gravity Prices
1.2-litre 5MTRs 10.12 lakhRs 10.50 lakh
1-litre Turbo iMTRs 10.72 lakhRs 11.20 lakh
1.5-litre diesel 6MTRs 11.62 lakhRs 12 lakh

हेही वाचा… ड्रम ब्रेक की डिस्क ब्रेक! कोणत्या ब्रेकची बाईक घेणे आहे योग्य? वाचा अन् गोंधळ दूर करा

किआ सोनेट ग्रॅविटी: फिचर्स (Kia Sonet Gravity Features)

HTK प्लस ट्रिमने न दिलेल्या काही गोष्टी सोनेट ग्रॅव्हिटी व्हेरिएंट ऑफर करतो. या नवीन एडिशनमध्ये ब्रेक कॅलिपर, नेव्ही कलर स्टीचिंगसह इंडिगो पेरा सीट्स, लेदर फिनिश गियर नॉब, एक स्पॉयलर आणि ड्युअल-टोन 16-इंच अलॉय व्हील आहेत. किआने केबिनमध्ये वायरलेस फोन चार्जर, डॅश कॅम, फ्रंट डोअर आर्मरेस्ट, 60:40 स्प्लिट सीट्स, रेअर अ‍ॅडजस्टेबल हेडरेस्ट्स, कप होल्डर्ससह रेअर सेंटर आर्मरेस्ट, आणि ग्रॅव्हिटी एम्बलम यांसारखे अतिरिक्त फिचर्स अ‍ॅड केली आहेत.