एसएआर ग्रुपची इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनी आणि पर्यावरणपूरक मोबिलिटी उत्पादने व सुविधा क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी लेक्ट्रिक्स ईव्हीने नुकत्याच दोन ईव्ही स्कूटर्स लॉन्च केल्या आहेत. तसेच कंपनीने यामध्ये तब्बल ९३ जबरदस्त फीचर्स दिली आहेत. तर या दोन्ही नेव्ही स्कूटर्सबद्दल जाणून घेऊयात. लेक्ट्रिक्स LAXS G ३.० आणि LAXS G २.० या दोन इलेक्ट्रिक स्कूटर त्यांच्यात असलेल्या ९३ फीचर्समुळे शहरी भागात क्रांती घडवून आणतील. या स्कुटर्समध्ये ३६ सेफ्टी फीचर्स, २४ स्मार्ट फीचर्स आणि १४ कम्फर्ट फीचर्स इत्यादींचा समावेश आहे. आपल्या प्रत्येक ग्राहकाला आधुनिक, सुरक्षित, इंटेलिजंट आणि कनेक्टेड मोबिलिटीचा लाभ घेता यावा हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

या दोन्ही स्कूटर्समध्ये देण्यात आलेल्या अनेक फीचर्सपैकी बरेचसे फिचर हे ईव्ही सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच आणली जात आहेत. बहुतांश ईव्ही स्कूटर्स कॅटेगरीच्या १ लाख रुपयांच्या परवडण्याजोग्या व स्पर्धात्मक किंमतीच्या रेंजमध्ये पहिल्यांदाच उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सर्टिफाईड प्लॅटफॉर्म आणि अत्याधुनिक कनेक्टेड तंत्रज्ञान या सर्वांचा समावेश असल्यामुळे लेक्ट्रिक्स स्कूटर्स इतरांपेक्षा अनोख्या ठरतात.

हेही वाचा : Creta चा खेळ खल्लास करण्यासाठी नव्या अवतारात येताहेत दोन SUV, पहिल्या कारला २१ हजारात करा बुक

लेक्ट्रिक्स ईव्हीचे एमडी आणि सीईओ श्री के विजय कुमार यांनी सांगितले, “एलएक्सएस जी स्कूटर्समध्ये तब्बल ९३ फीचर्स आहेत, जी जेन झेडच्या गरजा, आवडीनिवडी डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली आहेत. भारतातील जेन झेडला उत्तमप्रकारे कनेक्टेड असलेली गाडी हवी असते, म्हणूनच या स्कूटर्समध्ये स्मार्ट नेव्हिगेशन, सेगमेंटमध्ये प्रथमच आणले गेलेले ऑटो-इंडिकेटर्स, ओव्हर द एअर अपडेट्स, फाईंड-माय-वेहिकल, इमर्जन्सी एसओएस बटन्स इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. युवकांना पाहताक्षणी आवडेल असे सुबक डिझाईन आणि आकर्षक, उठावदार रंग यामुळे ईव्ही स्कूटर्स अजून जास्त मोहक बनल्या आहेत.”

इंटिग्रेटेड नेव्हिगेशन सिस्टिम, स्मार्ट सुरक्षा वैशिष्ट्ये, व्हॉइस असिस्टंट आणि अतिशय मजबूत चेसिस यांना तब्बल २.६ लाख किमीपेक्षा जास्त प्रवासात अनेक कठीण तपासण्या केल्यानंतर या स्कूटर्समध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. ही सर्व उच्च तंत्रज्ञान वैशिष्ट्ये या स्कूटर्ससोबत मिळणारा रायडींग अनुभव अजून जास्त वाढवतात. या स्कुटर्समध्ये तंत्रज्ञानावर आधारित सुविधांचा लाभ घेता येतो, ऑटो-इंडिकेटर्स, स्मार्ट इग्निशन, हेल्मेट वॉर्निंग, वेहिकल डायग्नॉस्टिक्स, राईड स्टॅटिस्टिक्स, मोबाईल ऍपमार्फत रिमोट सीट ऑपरेटिंग, अँटी-थेफ्ट मेकॅनिजम इत्यादी या स्कूटर्समधील अनेक सुविधा सध्या उपलब्ध असलेल्या अनेक ईव्हींमध्ये मिळत नाहीत.