टाटा मोटर्स, मारुती सुझुकी आणि होंडा यांसारख्या कंपन्यांनंतर आता महिंद्रा अँड महिंद्रानेही आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे. कंपनीने १ जानेवारीपासून आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, पुढील वर्षी जानेवारीपासून आपल्या प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवणार आहेत. उत्पादन खर्च वाढल्यामुळे वाहनांच्या किमतीत ही वाढ करण्यात आली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

महागाई आणि वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे उत्पादन खर्च वाढला आहे. कंपनीने सांगितले की, या वाढीव खर्चाचा मोठा भार स्वतःवर घेण्याचा प्रयत्न केला आहे पण आता त्याचा काही भाग ग्राहकांनाही दिला जाईल. महिंद्राने सांगितले की, प्रवासी आणि व्यावसायिक मॉडेल्सच्या आधारावर किमतीत वाढ वेगवेगळ्या प्रमाणात केली जाईल.

(हे ही वाचा : देशात बोल्ड लुकसह दाखल झालेल्या ७ सीटर कारवर मिळतोय ११.८५ लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट )

‘या’ कंपन्यांनी किमती वाढवल्या

महिंद्रा अँड महिंद्रापूर्वी इतर अनेक ऑटो कंपन्यांनी किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये होंडा, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, ऑडी यांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपनीने आपले मॉडेल आणि किंमती वाढवण्यामागे अनेक कारणे दिली आहेत. महागाई आणि वस्तूंच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे निर्माण झालेल्या दबावामुळे किमती वाढवण्याचा निर्णय कंपनीने घेतला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तथापि, कंपनीने पुढे सांगितले की, आम्ही खर्च कमी करण्यासाठी शक्य ते सर्व पावले उचलत आहोत. मात्र महागाईमुळे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.