महिंद्राच्या वाहनांना नागरिकांची प्रचंड पसंती मिळत आहे. एक्सयूव्ही ७००, स्कॉर्पिओ एनसह कंपनीच्या ताफ्यातील अनेक दमदार वाहनांची बुकिंग वाढली असून प्रतीक्षा कालावधीही वाढला आहे. दरम्यान महिंद्राने या वर्षी सप्टेंबर महिन्यात mahindra xuv 400 इलेकट्रिक एसयूव्ही लाँच केली होती. आता या कारचे नवीन लिमिटेड एडिशन सादर झाले आहे.

ऑटोमोटिव्ह डिझायनर प्रताप बोस यांनी प्रसिद्ध फॅशन डिझायनर रिमझिम दादू यांच्यासोबत काम करून हे स्पेशल एडिशन विकसित केले. हे अनोखे मॉडेल महिंद्राच्या ऑटोमेटिव्ह टेक फॅशन टूरच्या सहाव्या सिजनमध्ये दिसून आले होते. कारच्या फॅब्रिकवर आणि तिला फॅशनेबल लूक देण्यावर काम करण्यात आले आहे.

(रणबीरच्या ‘त्या’ अनोख्या वाहनाची चर्चा, मुंबईत व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या खास फीचर्स)

एसयूव्हीमधील नवीन अपहोल्सटरी रिमझिम दादू यांनी तयार केली आहे. कारमध्ये कॉपर स्टिचिंगसह ब्लॅक लेदर सिट्स, ब्ल्यू इनले, डफल बॅग, साईड बॅग आणि मागे ब्ल्यू स्टिल वायर कुशन देण्यात आले आहे. यासह रिमझिम दादू एक्स बोस असे ब्रँडिंग देण्यात आले आहे.

कारमधील विविड आर्क्टिक ब्ल्यू रंग हा कॅबिनच्या अपहोल्सटरीशी मिळतो. कार बेस, ईपी आणि ईएल या तीन व्हेरिएशनमध्ये सादर होण्याची शक्यता आहे. स्पेशल एडिशन एक्सयूव्ही ४०० मध्ये कोणतीही यांत्रिकी सुधारणा नाही. महिंद्रा एक्सयूव्ही ४०० मध्ये इलेक्ट्रिक मोटर, ३४ किलोवॉट हवर बॅटरीपॅक मिळतो. कार ३१० एनएमचा पीक टॉर्क आणि १५० बीएचपीची शक्ती निर्माण करते.

(नवीन रंगांसह लाँच झाली SPECIAL EDITION APACHE, १५९ सीसी इंजिन, ‘PULSAR 150’ला देणार टक्कर)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एसयूव्ही ० ते १०० किमी प्रति तासाचा वेग ८.३ सेकंदात गाठते. सिंगल चार्जमध्ये कार ४५६ किमी प्रमाणित रेंज देणार, असा दावा करण्यात आला आहे. ५० किलोवॉट फास्ट चार्जरच्या सहायाने कार ५० मिनिटांमध्ये ० ते ८० टक्के चार्ज होते. XUV400 टाटा नेक्सॉन ईव्ही प्राईम, एमजी झेडएस ईव्ही आणि ह्युंडाई कोना इलेक्ट्रिकशी स्पर्धा करेल.