कार क्षेत्रातील हॅचबॅक सेगमेंटला ग्राहकांची सर्वाधिक पसंती आहे. कमी-बजेटच्या मायलेज कार तसेच काही प्रीमियम डिझाइन आणि वैशिष्ट्यांसह कारसाठी प्राधान्य दिले जाते. तुम्हालाही कमीत कमी बजेटमध्ये प्रीमियम हॅचबॅक कार खरेदी करायची असेल, तर या सेगमेंटमधील दोन लोकप्रिय गाड्यांचे संपूर्ण तपशील येथे जाणून घ्या. या दोन्ही गाड्या त्यांच्या डिझाइन आणि वैशिष्ट्यांसाठी पसंत केल्या आहेत. या तुलनेसाठी आज आमच्याकडे Maruti Baleno 2022 आणि Hyundai i20 आहेत, ज्यामध्ये आम्ही त्या दोघांची किंमत ते फीचर्सपर्यंत संपूर्ण तपशील सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Maruti Baleno facelift 2022: मारुती बलेनो ही त्याच्या कंपनीची लोकप्रिय हॅचबॅक आहे. २३ फेब्रुवारी रोजी फेसलिफ्ट अवतारात लाँट झाली आहे. या कारमध्ये ११९७ सीसीचे १.२ लीटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ५ स्पीड मॅन्युअल आणि ५स्पीड एएमटी ट्रान्समिशनच्या पर्यायासह ९० पीएस पॉवर आणि ११३ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीने या गाडीत हेड-अप डिस्प्ले दिला आहे, या सेगमेंटमध्ये प्रथमच दिला गेला आहे, याशिवाय ३६० डिग्री कॅमेरा, रियर एसी व्हेंट, रिअर फास्ट चार्जिंगसह ९ इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. यूएसबी पोर्ट, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटी. टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्रूझ कंट्रोल, ऑटो क्लायमेट कंट्रोल, पुश बटण स्टार्ट-स्टॉप, कीलेस एंट्री सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. मारुती बलेनोच्या सुरक्षेच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, कंपनीने यामध्ये सहा एअरबॅग्ज, ईएसपी, हिल होल्ड असिस्टन्स, आयएसओ फिक्स्ड माउंट, एबीएस, ईबीडी, स्पीड अलर्ट यांसारखे फीचर्स दिले आहेत. मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, नवीन मारुती बलेनो फेसलिफ्ट 2022 कार २२.३५ किमीचा मायलेज देते. मारुती बलेनो 2022 कंपनीने ६.३५ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लाँच केली आहे. टॉप व्हेरियंटमध्ये जाताना ९.४९ लाखांपर्यंत जाते.

महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक वाहनांना चालना देण्यासाठी पुढाकार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंकडून मुंबईत इव्ही सेलचं उद्घाटन

Hyundai i20: ह्युंदाई i20 ही त्याच्या कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या हॅचबॅक कारमध्ये गणली जाते. ही गाडी तिच्या स्पोर्टी डिझाइनसाठी पसंत केली जाते. ह्यंदाई i20 च्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनचा पर्याय दिला आहे. पेट्रोल इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, हे १४९३ सीसी १.२ लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड इंजिन आहे. ८३ पीएस पॉवर आणि २४० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसह ५-स्पीड मॅन्युअल आणि ५-स्पीड एएमटी ट्रांसमिशनशी जोडलेले आहे. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेच्या कनेक्टिव्हिटीसह १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. याशिवाय एअर प्युरिफायर, ब्लू लिंक कनेक्टेड कार टेक, सनरूफ, सिक्स एअरबॅग्ज, रिअर पार्किंग सेन्सर, ईएससी आदी फीचर्स देण्यात आले आहेत. मायलेजबाबत, कंपनीचा दावा आहे की, ह्युंदाई i20 १९.६५ किमीचा मायलेज देते, आणि ARAI ने प्रमाणित केले आहे. ह्युंदाइ i20 ची सुरुवातीची किंमत ६.९८ लाख रुपये असून टॉप व्हेरियंटवर जाताना ११.४७ लाख रुपयांपर्यंत जाते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti baleno 2022 vs hyundai i20 know style feature and price rmt
First published on: 24-02-2022 at 15:26 IST