उत्तम फीचर्स, डिझाईन असेलेल्या अनेक कार भारतीय बाजारात उपलब्ध आहेत. परंतु सर्व सामान्य माणसाला नेहमी अशा कारची आवश्यकता असते, जी कमी किमतीत धावते आणि तिच्या देखभालीमध्ये जास्त त्रास सहन करावा लागत नाही. यामुळे अनेक कंपन्या ग्राहकांच्या गरजा समजून त्यांची वाहने विकत आहेत.

या गाड्या केवळ कमी बजेटमध्येच येत नाहीत तर आपल्याला दीर्घकाळ सेवा देतात आणि या गाड्यांमध्ये मिळणाऱ्या इंजिनांना जास्त देखभाल करण्याची आवश्यकता नसते. यामुळे, लोक त्यांना बराच काळ चालवतात आणि या गाड्या जुन्या झाल्या तरी त्यांना चांगले पुनर्विक्री मूल्य मिळते. आज आम्ही तुम्हाला एका अशा कारबद्दल सांगणार आहोत, जी भारतीय बाजारपेठेत उत्कृष्ट इंजिन आणि कामगिरीमुळे लोकांची मने जिंकत आहेत. जानेवारी २०२४ मध्येही या कारनं विक्रीत बाजी मारली आहे.

भारतीय बाजारपेठेतील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी आपली प्रीमियम हॅचबॅक बलेनोची विक्री करत आहे. ही कार देशातील मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ही कार प्रीमियम वैशिष्ट्ये, स्टायलिश डिझाइन आणि इंधन कार्यक्षम इंजिनसह येते. आज आम्ही तुम्हाला या कारची वैशिष्ट्ये सांगत आहोत…

(हे ही वाचा : दर ५ मिनिटाला १ विकली जातेय ‘ही’ SUV कार, खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा; १० लाखाहून अधिक गाड्यांची झाली विक्री)

मारुती बलेनोमध्ये १.२-लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन ९० bhp पॉवर आणि ११३ Nm टॉर्क जनरेट करते. कंपनी फॅक्टरी फिटेड सीएनजी आवृत्तीमध्ये बलेनो देखील ऑफर करते. बलेनो ५-स्पीड मॅन्युअल आणि ५-स्पीड AMT गिअरबॉक्सच्या पर्यायासह उपलब्ध आहे.

तथापि, त्याच्या CNG आवृत्तीमध्ये फक्त मॅन्युअल गिअरबॉक्स पर्याय उपलब्ध आहे. मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास, ही कार पेट्रोलमध्ये २२.९४ किमी आणि सीएनजीमध्ये ३०.६१ किमी मायलेज देते.

सुरक्षिततेच्या दृष्टीने, या कारमध्ये ६ एअरबॅग्ज, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), हिल-होल्ड असिस्ट, सर्व प्रवाशांसाठी ३-पॉइंट सीट बेल्ट, मागील पार्किंग सेन्सर आणि ३६० डिग्री कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. बलेनोमध्ये ३१८ लीटरची बूट स्पेस आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मारुती बलेनो चार प्रकारांमध्ये खरेदी केली जाऊ शकते. यात सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा चा समावेश आहे. त्याची किंमत ६.६६ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि ९.८८ लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.