इंडो-जपानी ऑटोमेकर मारुती सुझुकीसाठी तिची एक कार सुपरहिट ठरली आहे. या कंपनीच्या कारची विक्री दणक्यात होत आहे. देशातील बाजारपेठेत नुकत्याच लाँच झालेल्या एसयुव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शानदार लूक आणि फीचर्समुळे या कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर एसयूव्हीची मागणी वाढली आहे. २०२३ च्या ऑटो एक्सपोमध्ये या कारला सर्वप्रथम सादर करण्यात आले होते. तेव्हापासूनच ग्राहक या कारच्या प्रेमात पडले होते. आता विक्रीच्या बाबतीत या कारने नवा विक्रम नोंदविला आहे.

मारुतीने गेल्यावर्षी देशात आपली कॉम्पॅक्ट क्रॉसओवर फ्रॉन्क्स लाँच केली होती. ज्या कारची चांगली विक्री झाली आहे. ही कार गेल्या १४ महिन्यांपासून बाजारात आहे आणि या कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर फ्रॉन्क्स कारची १.५ लाख युनिट्सची विक्री झाली आहे. पहिल्या १ लाख फ्रॉन्क्स कारची विक्री करण्यासाठी दहा महिने लागले तर गेल्या चार महिन्यांत ५०,००० हून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत.

एप्रिल २०२४ मध्ये मारुती फ्रॉन्क्सच्या एकूण १४,२८६ युनिट्सची विक्री झाली, ज्यासह तिने बलेनोला मागे टाकले आणि नेक्साची सर्वाधिक विक्री होणारी कार बनली. तथापि, मे २०२४ मध्ये, बलेनोने १२,८४२ युनिट्सच्या विक्रीसह पुन्हा नंबर-१ स्थान मिळवले तर फ्रॉन्क्सने १२,६८१ युनिट्सची विक्री केली.

(हे ही वाचा : देशात ‘या’ ६ एअरबॅग्स असलेल्या SUV कडे ग्राहकांनी फिरवली पाठ; ३० दिवसात विक्री ०, पाच महिन्यात फक्त २ लोकांनी केली खरेदी)

इंजिन आणि वैशिष्ट्ये

मारुती सुझुकी फ्राँक्सला इंडियन मार्केटमध्ये एकूण १२ व्हेरियंट्स मध्ये आणले आहे. हे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन मध्ये आहे. सध्याच्या Fronx मध्ये दोन इंजिन पर्याय आहेत. १-लिटर टर्बो-पेट्रोल (१००PS/१४८Nm) आणि १.२-लिटर ड्युअलजेट पेट्रोल (९० PS/११३ Nm). या कारच्या काही खास वैशिष्ट्यांमध्ये ९-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, हेड-अप डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल आणि ऑटो क्लायमेट कंट्रोल यांचा समावेश आहे. या कारचे १.२ लीटर पेट्रोल व्हेरिएंट २१.७९ किलोमीटर प्रति लिटरपर्यंत मायलेज देते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरक्षेच्या दृष्टीने कंपनीने या SUVमध्ये ६ एअरबॅग, ३ पॉइंट ईएलआर सीटबेल्ट सारखे फीचर्स दिले आहेत. याशिवाय कंपनीने या वाहनात ३६० व्ह्यू आणि हाय एंड तंत्रज्ञान देखील जोडले आहे. याशिवाय वायरलेस स्मार्टफोन चार्जर, वायरलेस अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. आकर्षक लुक आणि शक्तिशाली इंजिन क्षमतेने सुसज्ज असलेल्या या एसयूव्हीची किंमत ७.४६ लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी १३.१३ लाख रुपयांपर्यंत जाते.