देशात सणासुदीचा हंगाम सुरु आहे. तुम्ही या काळात एखादी नवी कार घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. देशातील दिग्गज आॅटो वाहन निमार्ती कंपनी मारुती सुझुकी आपल्या नुकत्याच लाँच केलेल्या कारवर मोठा डिस्काउंट देत आहे. तुम्हाला ही कार स्वस्तात घरी आणण्याची ही एक मोठी संधी आहे.

मारूती सुझुकीने आपली बहुप्रतिक्षित एसयूव्ही Maruti Jimny चार महिन्यापूर्वीच देशात दाखल केली आहे. मारुतीची ही ऑफरोडिंग कार सहा व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. ही कार लाँच झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी खरेदी केली आहे. आता या कारवर एक लाख रुपयांपर्यंतचा ऑफरही दिल्या जात आहे. सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर, देशभरातील मारुती सुझुकी नेक्सा डीलर्स जिमनीच्या एंट्री-लेव्हल झेटा व्हेरियंटवर १ लाखांपर्यंतचा ऑफर देत आहेत.

(हे ही वाचा : बाकी कंपन्यांचे उडाले होश, ‘ही’ कंपनी देशात आणतेय पहिली सीएनजी बाईक, महाराष्ट्रातील ‘या’ शहरात होणार निर्मिती )

ऑफर काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, जिमनी झेटा सध्या ५०,००० रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटवर उपलब्ध आहे आणि ऑफरवर अतिरिक्त ५०,००० रुपये एक्सचेंज किंवा लॉयल्टी बोनस देखील आहे. ही ऑफर महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजेच ३१ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध आहे. Zeta व्हेरियंटच्या मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही पर्यायांवर या ऑफरचा लाभ घेता येईल.

किंमत

Zeta हे जिमनी लाइन-अपमधील एंट्री-लेव्हल व्हेरियंट आहे, ज्याची किंमत १२.७४ लाख (मॅन्युअल) आणि रु. १३.९४ लाख (स्वयंचलित) आहे. हे टॉप-स्पेक जिमनी अल्फा प्रमाणेच १.५-लीटर K15B पेट्रोल इंजिनसह येते. हे ४WD सेटअपसह येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैशिष्ट्ये

जिमनी झेटामध्ये स्टील व्हील्स, ७.०-इंच टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, अॅपल कारप्ले, ६ एअरबॅग्ज आणि ईएसपी आणि इतर अनेक वैशिष्ट्ये आहेत. जिमनी हे कंपनीचे प्रीमियम उत्पादन आहे. लाँच झाल्यापासून, दरमहा सुमारे ३,०० युनिट्सची विक्री सतत होत आहे. मारुती 5-Door जिम्नीला ग्राहकांची खूप पसंती मिळत आहे.