Maruti Suzuki: भारतीय वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीचा गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय वाहन बाजारावर दबदबा आहे. नोव्हेंबर २०२२ मधील वाहनांच्या विक्रीची आकडेवारी पाहता मारुती सुझुकी बाजारात पहिल्या नंबरवर कायम आहे. विशेष म्हणजे, या बाबतीत मारुतीच्या या कारच्या आसपास कुठलीच कंपनी नाही. मागच्या महिन्यात कंपनीने देशातच नव्हेतर विदेशामध्येही आपला डंका वाजवला आहे. चला तर जाणून घेऊया कंपनीच्या कोणत्या कारने हा विक्रम केला आहे.

‘ही’ कार ठरली नंबर 1
नोव्हेंबर २०२२ मध्ये मारुती बलेनो सार्वधिक विक्री होणारी कार ठरली आहे. तसेच विदेशामध्ये देखील ही कार सर्वाधिक विकली गेली आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर २०२२ मध्ये २०,९४५ ग्राहकांनी मारुती बलेनो कार खरेदी केली आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात ही कार ९,९३१ ग्राहकांनी खरेदी केली होती. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत या कारच्या विक्रीत १११ टक्के वाढ झाली आहे. मारुती सुझुकी बलेनो ही सर्वात जास्त निर्यात केलेली कार होती, ज्याची एकूण ५,२२१ युनिट्स परदेशी बाजारपेठेतही निर्यात केली आहे.

(आणखी वाचा : Auto Expo 2023: जानेवारीमध्ये Maruti Suzuki करणार धमाका; सोबतच इलेक्ट्रिक कारही येणार )

Hyundai Grand i10 Nios ने एकूण ४३७४ युनिट्सची निर्यात केली. निसान सनीची ४,२६२ युनिट्सची विक्री करण्यात आली आहे. ही तिसऱ्या क्रमांकावर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Kia Seltos चौथ्या क्रमांकावर असून नोव्हेंबरमध्ये एकूण ४,१९५ युनिट्सची निर्यात झाली. Hyundai Verna पाचव्या स्थानावर आहे, ज्याने गेल्या महिन्यात एकूण ३९४० युनिट्सची निर्यात केली.