Upcoming Maruti Strong Hybrid Cars: मारुती सुझुकी सुरुवातीपासूनच भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगात आघाडीवर आहे. उच्च मायलेज असलेल्या परवडणाऱ्या कारचे उत्पादन हे कंपनीच्या यशामागील प्रमुख कारणांपैकी एक आहे. आता कंपनी भविष्यात नवीन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्यूशन्सवर देखील लक्ष केंद्रित करत आहे. गेल्या वर्षी, कार निर्मात्याने टोयोटाच्या सहकार्याने आपले पहिले मजबूत हायब्रिड वाहन मारुती ग्रँड विटारा लाँच केले. आता कंपनीने मजबूत हायब्रिड तंत्रज्ञानासह चार नवीन मॉडेल्स आणण्याची योजना आखली आहे, जी २०२३-२४ मध्ये रस्त्यावर लाँच केली जाऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ दमदार हायब्रिड कार लवकरच येणार

  • NEW MARUTI 7-SEATER MPV

मारुतीची आगामी ७-सीटर एमपीव्ही टोयोटा इनोव्हा हायक्रॉसवर आधारित असेल. यंदाच्या सणासुदीच्या काळात हे मॉडेल बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये काही डिझाइन बदल दिसतील तर प्लॅटफॉर्म, वैशिष्ट्ये आणि पॉवरट्रेन समान राहतील. त्याची किंमत २० लाख ते ३० लाख रुपये असू शकते.

(हे ही वाचा : Hyundai चा मोठा धमाका! नव्या टर्बो पेट्रोल इंजिन सोबत आलेली SUV करणार Creta वर मात! किंमत…)

  • NEW MARUTI 7-SEATER SUV

मारुती सुझुकी या वर्षाच्या अखेरीस ग्रँड विटारावर आधारित ७ सीटर एसयूव्ही आणू शकते. नवीन मारुती ७-सीटर SUV १.५L K१५C पेट्रोल माइल्ड हायब्रीड आणि १.५L अॅटकिन्सन सायकल स्ट्राँग हायब्रिड पॉवरट्रेनसह उपलब्ध करून दिली जाऊ शकते. ते २७.९७kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते.

  • NEW-GEN MARUTI SWIFT AND DZIRE

नवीन जनरेशनच्या मारुती स्विफ्ट आणि डिझायर याही मारुती सुझुकीच्या आगामी मजबूत हायब्रीड कार आहेत. अहवालानुसार, दोन्ही मॉडेल नवीन १.२-लिटर, ३-सिलेंडर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित असतील, जे टोयोटाच्या मजबूत हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. नवीन स्विफ्ट आणि डिझायर ३५-४० kmpl पेट्रोलचे मायलेज देऊ शकतात.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki upcoming maruti strong hybrid cars high on mileage pdb
First published on: 09-03-2023 at 15:55 IST