Mercedes Benz Google Partnership: मर्सिडीज बेंझने काही दिवसांपूर्वी गुगलबरोबरच्या दीर्घकालीन भागीदारीची घोषणा केली. या घोषणेनंतर मर्सिडीज गाडीच्या इन्फोटेनमेंट सिस्टममध्ये यूट्यूब अ‍ॅप देखील जोडले जाणार आहे. तसेच सिस्टीमशी गुगल मॅपमधील माहिती जोडली जाणार आहे. यामुळे चालकाला गाडी चालवताना आणखी चांगला ड्रायव्हिंग अनुभव मिळणार आहे.

मर्सिडीज बेंझ आणि गुगल यांच्या भागीदारीमुळे चालकांना गुगलद्वारे दिल्या जाणाऱ्या प्लेस डिटेल्ससारख्या सुविधांचा वापर करता येणार आहे. त्याव्यतिरिक्त मर्सिडीज कंपनीला गुगल मॅप्समधील डेटाचा वापर देखील करता येणार आहे. गुगल क्लाउड आर्टिफिशियरल इंटेलिजन्सस (एआय), डेटा आणि ओपन इन्फ्रास्ट्रक्चर सोल्यूशन्स वापरुन ग्राहकांना उत्तम अनुभव देण्याचा प्रयत्न दोन्ही कंपन्याद्वारे केला जाणार आहेत. गुगल मॅप्स प्लॅटफॉर्म, क्लाउड, यूट्यूब यांमुळे गाडीमधील नेव्हिगेशन इंटरफेस डिझाइन अधिक सक्षम करण्यासाठी मदत होणार आहे.

pegasus apple advisory
iPhone वर ‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरचे संकट, खासगी डेटावर हॅकर्सची संभाव्य ‘नजर’; उपाय काय?
entrepreneur and digital freelancer Saheli Chatterjee
सोशल मीडियावर ११० रुपयांनी सुरू झाली कमाई; आता आहे कोट्यावधींची मालकीण! जाणून घ्या ‘या’ उद्योजिकेचा प्रवास
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
RBI Monetary Policy Meeting 2024 Repo Rate Unchanged Marathi News
RBI MPC Meet : रेपो दरात कोणताही बदल नाही; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, कर्जदारांना दिलासा!

आणखी वाचा – भारतातील रस्त्यांवर धावणार आता हायड्रोजन बसेस, धुराऐवजी सोडणार पाणी

गुगलसह भागीदारी करुन आम्ही ग्राहकांना अनोख्या सेवा पुरवण्यासाठी खूप उत्सुक आहोत. आमच्या कंपनीच्या ग्राहकांना गाडीमध्ये गुगलच्या सर्व फिचर्सचा वापर करणे शक्य होणार आहे, असे मर्सिडीज बेंझ कंपनीच्या ओला कॅलेनियस यांनी म्हटले आहे. त्यावर गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, गुगल एआय आणि डेटा यांच्या आधारे गाडीतील सिस्टीमची क्षमता वाढवणे शक्य होणार आहे. त्यासह ऑटोमॅटिक ड्रायव्हिंगमध्येही सुधारणा करण्यास मदत होणार आहे.

आणखी वाचा – एथर, ओला दोघांनाही पुरून उरणार ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर; कंपनीला आहे ठाम विश्वास

या भागीदारीमुळे एलॉन मस्कच्या टेस्ला आणि बीवायडी सारख्या कंपन्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. जनरल मोटर्स, रेनॉल्ट, निसान, फोर्ड यासारख्या कंपन्यांच्या वाहनांमध्ये गुगल मॅप्स, गुगल असिस्टंट अशा सेवा उपलब्ध आहेत.