Hydrogen Buses in India : देशातील सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून अनेक मोठा बदल घडताना दिसतात. आत्तापर्यंत सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील वाहनं केवळ पेट्रोल आणि डिझेलवरचं धावत होती, मात्र गेल्या दोन- तीन वर्षांपासून सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात बॅटरीवर धावणाऱ्या इलेक्ट्रीक बसेसचा वापर मोठ्याप्रमाणात होताना दिसतोय. मुंबई, दिल्लीसह अनेक महत्वाच्या शहरांमध्ये इलेक्ट्रॉनिक बसेस धावत आहेत. आता यापुढचं पाऊल म्हणजे थेट हायड्रोजन इंधनावर भारतातील बसेस धावताना दिसणार आहेत. ही भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील एक नवी क्रांती आहे. ओलेक्ट्राने, रिलायन्सच्या तंत्रज्ञानाच्या सहकार्याने हायड्रोजन बस विकसित करण्याची घोषणा केली आहे. यामुळे भारतातील रस्त्यांवर आगामी काळात पेट्रोल – डिझेलवर नाही तर हायड्रोजनवर धावणाऱ्या बसेस दिसणार आहे.

धुराऐवजी सोडणार पाणी

हायड्रोजन बस हा पारंपारिक इंधनावर चालणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीसाठीच्या वाहनासाठी कार्बनमुक्त पर्याय आहे. धूरा ऐवजी पाण्याचे उत्सर्जन करणाऱ्या बसेस लवकरच सार्वजनिक वाहतुकीत मोठी क्रांती घडवणार आहेत. महत्वाचे म्हणजे यामूळे देशाचे हायड्रोकार्बन म्हणजेच कार्बन इंधन आयात करण्यासाठी लागणारे बहुमुल्य परकिय चलन वाचणार आहे.

Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
navi mumbai buses marathi news, navi mumbai bus poor condition marathi news
डिझेल बसगाड्यांची दुरवस्था, एनएमएमटीच्या डिझेलवरील बसगाड्यांची तात्पुरती डागडुजी करण्यावर भर
trees Thane-Belapur industrial city
हरित पट्ट्याच्या मुळावर एमआयडीसी, २०० झाडांची कत्तल होणार, पर्यावरणवादी संस्थेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

‘या’ ठिकाणी होणार बसेसची निर्मिती

मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) ची उपकंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (OGL)नवीन तंत्रज्ञानावर आधारलेल्या या हायड्रोजन बसेसचे लवकरच भारतीय बाजारपेठेत आणणार आहे. पारंपारिक सार्वजनिक वाहतुकीला संपुर्ण कार्बनमुक्त पर्याय म्हणजे हायड्रोजन बस. वायु, जल प्रदुषणाला आळा घालणाऱ्या हायड्रोजनवर चालणाऱ्या या बसेस ऑलेक्ट्राच्या कारखान्यात तयार होणार आहेत.

लॉन्च झाली देशातील ‘ही’ एसयूव्ही EV Scooter, जाणून घ्या काय आहेत जबरदास्त फीचर्स

अशी आहे ‘या’ बसची रचना

या उपक्रमामुळे भारत सरकारच्या कार्बनमुक्त हायड्रोजन इंधनाच्या महत्त्वाकांक्षी मोहीमेला बळ मिळेल. 12-मीटरच्या लो-फ्लोअर बसमध्ये प्रवाशांसाठी 32 पासून 49 आसनाची सोय असणार आहे. या व्यतिरिक्त एक ड्रायव्हरचे आसन अशी एकूण आसन क्षमता असेल. या बसेसमध्ये वरच्या बाजूला टाइप-4 हायड्रोजन सिलिंडर बसवलेले असतात. हे सिलिंडर -20 ते +85 अंश सेल्सिअस तापमान सहन करू शकतात. येत्या वर्षात या बसेस व्यवसायिक वापरसाठी उपलब्ध करून देण्याचे ऑलेक्ट्राचे उद्दिष्ट आहे.

एकाचवेळी 400 किमीपर्यंत करु शकते प्रवास

एकदा हायड्रोजनची टाकी फुल्ल केल्यानंतर बस 400 किमी पर्यंत प्रवास करू शकेल. या प्रवासाला लागणारा हॉयड्रोजन वायू भरायला फक्त १५ मिनिटे लागतात. डिझेल पेट्रोल सारखे कार्बन इंधन वापरणाऱ्या पारंपारिक बसेसच्या उत्सर्जनाचा विचार केला तर या बसेस फक्त पाणी उत्सर्जीत करतात. जुन्या डिझेल आणि पेट्रोल वर चालणाऱ्या बसेस टप्प्याटप्प्याने पर्यावरणपूरक बसेसमध्ये परावर्तित केल्या जातील.