scorecardresearch

Premium

यामाहा R15 V4 ते बजाज पल्सर NS160 पर्यंत ‘या’ आहेत शक्तिशाली इंजिन असणाऱ्या टॉप ५ बाईक्स, जाणून घ्या किंमत

ग्राहकांना या सेगमेंटमधील बाईक्स खरेदी करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

top 5 powerful bikes in 150 to 160 cc
१५० ते १६० सीसीमधील शक्तीशाली ५ टॉप बाईक्स (Image Credit- Financial Express)

देशामध्ये सध्या अनेक कंपन्या अँलूं अनेक नवनवीन बाईक्स लॉन्च करत असतात. १५० ते १६० सीसी या सेगमेंटमधील बाईक्स या शक्तिशाली समजल्या जातात. ग्राहकांना या सेगमेंटमधील बाईक्स खरेदी करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या बाइक्स वेगवेगळ्या किमतीच्या रेंजमध्येही उपलब्ध आहेत. १५० ते १६० सीसी असणाऱ्या बाईक्स,बाईक्स प्रेमींमध्ये खूप लोकप्रिय आहेत. या बाइक्स परफॉर्मन्स आणि इंधन कार्यक्षमता यांच्यात योग्य संतुलन साधतात. शक्तिशाली इंजिन असणाऱ्या असाच ५ टॉप बाइकबद्दल आजपण माहिती जाणून घेऊयात.

Yamaha R15 V4

Yamaha R15 V4 या बाईकची एक्स शोरूम किंमत ही १.८१ लाख रुपये ते १.८६ लक्ष रुपये यामध्ये आहे. या बाईकमध्ये सिंगल सिलेंडर, फ्युएल इंजेक्टेड, लिक्विड कूल्ड टेक्नॉलॉजीवर आधारित १५५ सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. जे १८.१ बीएचपी पॉवर आणि १४. २ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ट्रान्स्मिशनसाठी या इंजिनसह ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त financial express ने दिले आहे.

Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
justin trudea canada india conflict
Video: “जस्टिन ट्रुडोंनी फार मोठी चूक केलीये”, अमेरिकेतील अभ्यासकांनी सांगितलं कारण; म्हणे, “हे म्हणजे मुंगीनं…”!

हेही वाचा : Honda ने केली मोठी घोषणा; ‘या’ नावाने ओळखली जाणार लवकरच लॉन्च होणारी SUV, जाणून घ्या

TVS Apache RTR 160 4V

TVS Apache RTR 160 4V या सेगमेंटमधील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या बाईक्सपैकी एक आहे. यामध्ये सिंगल सिलेंडर, ऑइल कूल्ड टेक्नॉलॉजीवर आधारित १५९. ७ सीसीचे इंजिन मिळते जे १७.३ बीएचपीची पॉवर आणि १४.७३ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. यामध्ये याला ५-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आले आहेत. TVS Apache RTR 160 4V मध्ये अनेक रायडींग मोड्स देण्यात आले आहेत. या बाईकची एक्सशोरूम किंमत ही १.२४ लाख ते १.३२ लाख रुपयांमध्ये आहे.

Bajaj Pulsar NS160

बजाज पल्सर NS160 या बाईकमध्ये सिंगल सिलेंडर,ऑइल कूल्ड टेक्नॉलॉजीवर आधारित असे १६०.३ सीसीचे इंजिन मिळते. जे १६.९ बीएचपीची पॉवर आणि ५-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. ट्रान्स्मिशनसाठी याला ५-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. कंपनीने ही बाईक एकाच पर्यायांमध्ये लॉन्च केली असून याची एक शोरूम किंमत १.३५ लाख रुपये इतकी आहे.

हेही वाचा : Car Price Hike: ग्राहकांसाठी मोठी बातमी! Honda आपल्या Amaze कारच्या किंमतीमध्ये करणार ‘इतक्या’ हजारांची वाढ

Hero Xtreme 160R

१५० ते १६० सीसी या सेगमेंटमधील पुढील बाईक आहे ती म्हणजे Hero Xtreme 160R. या सेगमेंटमधील ही सर्वात हलकी बाईक आहे. यामध्ये सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड टेक्नॉलॉजीवर आधारित १६३ सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. जे १५ बीएचपीची पॉवर आणि १४ एनएम इतके पीक टॉर्क जनरेट करते. ट्रान्स्मिशनसाठी याला ५-स्पीड गिअरबॉक्ससह जोडण्यात आले आहे. याची एक्स शोरूम किंमत ही १.१८ लाख ते १.३० लाख रुपयांपर्यंत आहे.

Honda XBlade

या लिस्टमध्ये सगळ्यात शेवटची बाईक आहे ती म्हणजे Honda XBlade. यामध्ये सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड टेक्नॉलॉजीवर आधारित १६२.७१ सीसीचे इंजिन मिळते. जे १३.७ बीएचपीची पॉवर आणि १४.७ एनएम इतके टॉर्क जनरेट करते. या बाईकची एक्स शोरूम किंमत १.२१ लाख रुपये इतकी आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-05-2023 at 13:09 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×