Neetu Kapoor’s Mercedes-Maybach GLS 600: नीतू कपूर या सत्तर-ऐशींच्या दशकामध्ये बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्री होत्या. लग्नानंतर त्यांनी चित्रपटांपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांपूर्वी त्यांनी पुन्हा चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. नीतू कपूर या सध्या त्यांच्या कार कलेक्शनमुळे चर्चेत आहेत. इतर अनेक सेलिब्रिटींप्रमाणे त्यांनाही गाड्यांचे वेड आहे. नुकतंच त्यांच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका आलिशान गाडी जोडली गेली आहे. नीतू यांनी काही दिवसांपूर्वी Mercedes-Maybach GLS 600 ही नवीकोरी गाडी खरेदी केली आहे.

२.९२ कोटी रुपये किंमत असलेली ही मर्सिडीज लक्झरी SUV दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, कृती सेनन, आयुष्मान खुराना, राम चरण अशा अनेक सिनेकलाकारांकडे आहे. आकर्षक लूक, विलक्षण फीचर्स आणि आलिशान ठेवण यामुळे मर्सिडीजची ही गाडी खरेदी करण्याचा मोह ग्राहकांना होत आहे. सिनेकलाकाराप्रमाणे अन्य सेलिब्रिटींच्या कार कलेक्शनमध्ये या गाडीचा समावेश आढळतो. नीतू कपूर यांनी विकत घेतलेल्या Mercedes-Maybach GLS 600 मध्ये ड्युअल टोन रंगसंगती आहे. हे फीचर मर्सिडीजच्या मेबॅक मॉडेल्समध्ये पाहायला मिळते. या गोष्टीमुळे ही गाडी इतर चारचाकींसमोर उठून दिसते.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

ही कार कॅव्हनसाइट ब्लू, एमराल्ड ग्रीन, ब्रिलियंट ब्लू, पोलर व्हाइट (नॉन मेटॅलिक), इरिडियम सिल्व्हर आणि मोजावे सिल्व्हर अशा काही शेडमध्ये उपलब्ध आहे. नीतू यांच्या मर्सिडीजच्या आत उत्तम इंटिरियर आहे. तसेच अ‍ॅडॉप्टिव्ह एअर सस्पेंशन, पॅनोरॅमिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, मेमरी फंक्शन अशा सुविधा आहेत. त्यासह पुढे-मागे होणाऱ्या सीट्स देखील आहेत. या आलिशान गाडीमध्ये व्हॉइस कमांड सेवाही आहे.

आणखी वाचा – चाहत्यांना जब्बर धक्का! तरुणांच्या ‘या’ आवडत्या बुलेटमध्ये आढळला मोठा दोष, Royal Enfield ने परत मागवल्या ‘इतक्या’ बाईक्स

नीतू कपूर यांनी विकत घेतलेली ही गाडी आतून फार प्रशस्त आहे. यामध्ये बसवलेले 4.0-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिन 557 हॉर्सपॉवर आणि 730 न्यूटन-मीटर टॉर्क निर्माण करु शकते. याव्यतिरिक्त या एसयूव्हीमध्ये 48V सौम्य-हायब्रिड प्रणाली सुद्धा जोडलेली आहे. याच्या वापरामुळे इंजिनच्या आउटपुटमध्ये अतिरिक्त 22 हॉर्सपॉवर आणि 250 न्यूटन-मीटर टॉर्क तयार होतो. गाडीमध्ये 9-Speed गिअरबॉक्स बसवण्यात आले आहेत. या गिअरबॉक्समुळे इंजिनद्वारे तयार होणारी ऊर्जा गाडीच्या चार चाकांमध्ये पोहचायला मदत होते.

Story img Loader