2025 Mahindra Bolero Neo: महिंद्रा कंपनीने बोलेरोसोबत त्यांचे नवीन बोलेरो निओचे फेसलिफ्टेड व्हर्जन लाँच केले आहे. आता जुन्या मॉडेलच्या तुलनेत यामध्ये कॉस्मेटिक अपग्रेड्स आणि नवीन फिचर्स पाहायला मिळणार आहेत. २०२५ महिंद्रा बोलेरो निओमध्ये नवीन डिझाइन्स आणि नवीन रंगाचे व्हेरिएशन्स देण्यात आले आहेत. बोलेरो निओची सुरूवातीची किंमत कमी करण्यात आली आहे आणि ती आता ८.४९ लाख रूपये एक्स-शोरूम पासून सुरू होते. N11 नावाचा एक नवीन टॉप एंड व्हेरिएंट देखील ऑफरवर आहे आणि त्याची एक्स शोरूम किंमत ९.९९ लाख रूपये आहे.
Variant | Current ex-showroom price | new ex-showroom price | difference |
N4 | ₹8.92 lakh | ₹8.49 lakh | ₹43,000 |
N8 | ₹9.54 lakh | ₹9.29 lakh | ₹25,000 |
N10 | ₹10.29 lakh | ₹9.79 lakh | ₹50,000 |
N11 | ₹9.99 lakh |
२०२५ महिंद्रा बोलेरो निओ फेसलिफ्ट
बाहेरच्या बाजूने बोलेरो निओ आता नवीन ग्रिल डिझाइनसह येते. यामध्ये हॉरिझॉन्टल स्लॅट्स वापरल्या आहेत. काँक्रिट ग्रे आणि जीन्स ब्लू असे दोन नवीन रंग उपलब्ध आहेत आणि ब्रँड आता ड्युअल टोन रंगदेखील देत आहे. या दोन रंगांव्यतिरिक्त डायमंड व्हाइट, स्टील्थ ब्लॅक, पर्ल व्हाइट आणि रॉकी बिज ऑफरमध्ये आहेत. बाजूला नवीन १५ इंच सिल्व्हर अलॉय व्हील्स आहेत आणि टॉप एंड व्हेरिएंटमध्ये मेटॅलिक ग्रे रंगात फिनिश केलेले १६ इंच अलॉय व्हील्स वापरण्यात आले आहेत.
आतमधून काय नवीन आहे?
गाडीचा आतील भाग मोका ब्राउन या नव्या रंगसंगतीत पूर्ण झाला आहे. ड्युअल टोन फिनिशसह ते खूपच प्रिमियम दिसते. टॉप एंड व्हेरिएंटमध्ये आतील भाग लूनर ग्रे रंगात पूर्ण झाला आहे. लेदरेट अपहोल्स्ट्री देखील ऑफर केली आहे आणि प्रवाशांना अधिक आधार आणि आराम देण्यासाठी सीट कुशनिंमध्ये देखील सुधारणा करण्यात आली आहे.

महिंद्रा बोलेरो निओची नवीन वैशिष्ट्ये कोणती?
महिंद्रा एक रियर व्ह्यू कॅमेरादेखील देत आहे, जो ड्रायव्हरला अरूंद पार्किंग जागेत एसयूव्ही पार्क करण्यात मदत करतो. मोबाईल डिव्हाइस चार्ज करण्यासाठी यूएसबी टाइप-सी पोर्टदेखील आहे. महिंद्रा सस्पेंशन सेटअपवरदेखील लक्ष केंद्रित करत आहे. आता प्रवाशांच्या आरामात वाढ करण्यासाठी राइडफ्लो टेक देत आहे.
इंजिनची वैशिष्ट्ये काय?
बोलेरो निओच्या इंजिनमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. ते तीन सिलेंडर युनिट आहे जे १०० बीएचपी कमाल पॉवर आणि २६० एनएम पीक टॉर्क निर्माण करते. ते ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यात कोणतेही ऑटोमॅटिक ट्रान्समिशन नाही.