सीएनजी, पेट्रोल आणि डिझेल वाहनांव्यतिरिक्त आता बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. परंतु त्यांची किंमत जास्त असल्याने ग्राहकांना ही वाहने खरेदी करण्यासाठी थोडा विचार करावा लागतो, परंतु राज्यांनुसार सरकारकडून सबसिडी देखील दिली जात आहे. आता केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच इलेक्ट्रिक वाहनांबाबत मोठी घोषणा केली आहे.

या घोषणेनुसार नितीन गडकरी यांनी दावा केला आहे की, येत्या एका वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनांप्रमाणेच कमी केल्या जातील. यासोबतच पेट्रोल आणि डिझेलवर खर्च होणारे परकीय चलन आपण वाचवू शकू, असेही ते म्हणाले. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणार्‍या बॅटर्‍या खूप महाग असतात. म्हणजे EV च्या एकूण खर्चापैकी ३५ ते ४० टक्के या बॅटऱ्यांवर खर्च होतो, ज्यामुळे EVs ची किंमत जास्त असते.

(हे ही वाचा : इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा विचार करताय? अर्थसंकल्पात मोदी सरकारने केली मोठी तरतूद; जाणून घ्या )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा खर्च कमी करण्यासाठी सरकारकडूनही अनेक प्रयत्न केले जात आहेत. एवढेच नाही तर ग्राहकांना सुलभ चार्जिंग सुविधा देण्यासाठी अनेक ठिकाणी नवीन चार्जिंग स्टेशन्सही उभारण्यात येत आहेत. मंत्र्यांच्या घोषणेनंतर ईव्हीच्या किमती कमी होतील, हे निश्चित झाले आहे, मात्र त्यासाठी किती वेळ लागेल हे अद्याप निश्चित करता आलेले नाही.