Odysse हा मुंबई स्थापन झालेला इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप असून व्होरा कंपनी समुहाचा एक भाग आहे. हा पूर्णपणे-इलेक्ट्रिक वाहतूक प्लॅटफॉर्म असून यामध्ये जगभरातील आघाडीच्या ई. व्ही. कंपोनंट उत्पादकांची आणि तंत्रज्ञांची सांगड घालण्यात आली आहे. Odysse कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च केली आहे. तर या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरचे फीचर्स आणि किती किंमतीत ती भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करण्यात आली आहे हे जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Odysse ने भारतीय बाजारपेठेत Trot (ट्रॉट ) नावाची नवीन इलेट्रीक स्कूटर लॉन्च केली आहे. ही स्कूटर B2B ग्राहकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. ही एक मजबूत इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक असल्याचा कंपनीचा दावा असून, ही स्कूटर २५० किलो वजन सहजपणे उचलू शकते.

हेही वाचा : राष्ट्रपतींच्या ताफ्यातील एक कार आहे एकदम खास! बॉम्ब, बंदुकीच्या गोळीनेही काही होत नाही; ‘हे’ फीचर्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क

ट्रॉट स्कूटरचे फीचर्स

ट्रॉट स्कूटरमध्ये २५० वॅटची इलेक्ट्रिक मोटर येते. तसेच याचा स्पीड हा प्रतितास २५ किमी इतका आहे. यामध्ये पपुढील बाजूस ड्रम ब्रेक व मागील बाजूस डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. चार्जिंगसाठी कंपनीने यामध्ये 60V 32Ah क्षमतेची काढता येणारी वॉटरप्रूफ बॅटरी लावली आहे. ही बॅटरी २ तासांमध्ये ६० टक्के चार्ज होते. स्कूटर संपूर्णपणे चार्ज होईल ४ तासांचा वेळ लागतो. एकदा चार्ज केल्यावर ही स्कूटर ७५ किमी इतके अंतर धावते. हे वाहन बी2बी वापरासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

ही स्कूटर B2B ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आली आहे. यामध्ये जास्त फीचर्स देण्यात आलेली नाहीत. पण ट्रॅकिंग, इमोबिलायझेशन, जिओ फेसिंग यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. B2B ग्राहकांच्या गरज लक्षात घेता यामधून गॅस सिलिंडरमी हार्डवेअरच्या वस्तू आणि पाण्याच्या मोठ्या बाटल्या , किराणा सामान , औषधे इत्यादी वस्तू सहजपणे घेऊन जात येणार आहेत.

हेही वाचा : Video: ‘पापा की परी’ हवेत उडताना, बाईकवरुन थरारक स्टंट, अन् घडलं…

ओडिसी इलेक्ट्रिक व्हेइकल्स प्रा. लि.चे सीईओ श्री. नेमिन व्होरा म्हणाले, “कोव्हिड-19 महासाथीने ई-कॉमर्स आणि लास्ट माइल डिलिव्हरी या दोन क्षेत्रांच्या वाढीला चालना दिली. सातत्याने नवीन प्रयोग करणे, संचलनाचा खर्च करणे आणि कार्यक्षमता वाढविणे याला डिलिव्हरी सेगमेंटमधील व्यवसायांकडून प्राधान्य देण्यात आले. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणे हा पर्यावरणस्नेही बदल आहे जो लोकांना व कंपन्यांना स्वीकारायचा आहे. या स्कूटरच्या निमित्ताने आम्ही बी2बी सेगमेंटमध्ये पदार्पण केले असून ही अशा प्रकारची एकमेव स्कूटर असून ती मार्केटमध्ये उलथापालथ घडवून आणणार आहे. ट्रॉटसारखी अमूलाग्र बदल घडविणारी प्रोडक्ट्स सादर करून या प्रगतीपथावर असलेल्या क्षेत्राचा पूर्ण लाभ घेण्यास आणि या सेगमेंटसाठी नवे मापदंड तयार करण्यास सज्ज आहोत.”

ट्रॉट स्कूटरची किंमत

Odysse कंपनीच्या या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ही ९९,९९९ रुपये आहे. यासोबतच कंपनीने स्कूटरच्या बॅटरीवर तीन वर्षांची आणि पॉवरट्रेनवर एक वर्षाची वॉरंटी दिली ​​आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odysse launched its new trot electric scooter for b2b customers in india tmb 01
First published on: 10-02-2023 at 10:08 IST