Ola Boss Sale : आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. घरोघरी आज घट बसविण्यात आले आहेत; तर सार्वजनिक मंडळांकडून देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तेव्हा नवरात्रीनिमित्त देशातील सर्वांत मोठी इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनी ओला खास ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजवर सूट जाहीर करण्यात आली आहे. सीईओ भाविश अग्रवाल यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर)वर ‘बॉस सेल’ची (Ola Boss Sale) घोषणा केली. ऑफर हायलाईट करताना पोस्टमध्ये म्हटले आहे, “बॉसने नुकताच कॉल केला आहे आणि तुम्हाला तो चुकवायचा नाही.”

तसेच हा ‘बॉस सेल’ (Ola Boss Sale) आज ३ ऑक्टोबरपासून सुरू झाला असून, या विक्रीला ‘सर्वांत मोठा ओला सीझन सेल’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या सेलमध्ये एंट्री-लेव्हल एस१ एक्स ईव्ही (S1 X EV) स्कूटर ४९ हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच स्कूटरच्या मूळ किमतीत (एमआरपी) सुमारे २५ हजार रुपयांची सूट मिळते आहे. या सवलतीच्या पॅकेजमध्ये संपूर्ण रेंजमध्ये १० हजार रुपयांच्या सवलतीचा समावेश आहे. तसेच, इतर सवलतींमध्ये एक्स्चेंज बोनस, स्मार्ट टेकमध्ये प्रवेश, आठ वर्षांची वॉरंटी, जलद चार्जिंगसाठी क्रेडिट यांचा समावेश असणार आहे.

हेही वाचा…Citroen C3 : फ्रंट फॉग लॅम्प, सहा एअरबॅग्ज; देशात फॅमिली SUV दाखल; किंमत नऊ लाखांपासून सुरू…

पोस्ट नक्की बघा…

११,११,१११ रुपयांचा रिवॉर्ड :

ओला इलेक्ट्रिक एक रेफरल प्रोग्राम ऑफर करीत आहे; ज्यात एस१ (S1) स्कूटरचा मालक ओला ईव्ही खरेदी करण्यासाठी मित्राला संदर्भ देऊ शकतो आणि त्या बदल्यात त्याला किंवा तिला तीन हजार रुपये देण्यात येतील आणि दुसरीकडे नवीन खरेदीदाराला दोन हजार रुपयांची सूट मिळेल. टॉप १०० रेफरिंग कम्युनिटी मेंबर्सना ११,११,१११ रुपयांचा रिवॉर्डसुद्धा दिले जाईल. एकंदरीत ही विक्री ((Ola Boss Sale)ओला इलेक्ट्रिकसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण- गेल्या काही महिन्यांत कंपनीच्या विक्रीत लक्षणीय घट झाली होती.

पोस्ट नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपासून ओला इलेक्ट्रिकच्या ग्राहक सेवा समस्यांमुळे खरेदीदार त्यांच्या उत्पादनांपासून दूर राहू लागले आहेत. त्यामुळे कंपनीचा मार्केट हिस्सा सप्टेंबरमध्ये सुमारे २७ टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाला आहे. या वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत ओला इलेक्ट्रिकने अप्रतिम विक्री केली. जुलैमध्ये ४०,८१४ युनिट्सची विक्री करण्यात केली. पण, त्यानंतर विक्रीत घट झाली आहे. ऑगस्टमध्ये २६,९२८ युनिट्स, सप्टेंबरमध्ये २३,९६५ युनिट्सची विक्री झाली. या समस्यांना सामोरे जाण्यासाठी कंपनीने वर्षाच्या अखेरीस एक हजार सेवा केंद्रे विस्तारण्याची घोषणा केली आहे.