गेल्या काही दिवसात भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढली. त्यामुळे एक एक करत अनेक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणल्या आहेत. यात काही नविन कंपन्यांचा समावेश देखील आहे. नुकतीच ओलाने इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. मात्र आता कंपनीने ओला एस १ प्रोची किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे. सध्या या गाडीची किंमत १,२९,९९९ रुपये आहे. १८ मार्चनंतर या स्कूटरची किंमत वाढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओलाने होळी निमित्ताने गेरु रंगात ओला एस १ प्रो सादर केली आहे. तथापि, गेरू रंगासह ओला एस १ प्रो फक्त १८ मार्च म्हणजेच आजच खरेदी करता येईल. कंपनीने सांगितले की, ओला एस १ प्रो च्या नवीन ऑर्डर्सची डिस्पॅच एप्रिल २०२२ पासून सुरू होईल. ही गाडी थेट ग्राहकांच्या घरी पोहोचवली जाईल. याशिवाय कंपनीने आपल्या स्कूटरसाठी नवीन अपडेट्सही जाहीर केले आहेत.या अपडेटमुळे कार्यप्रदर्शन सुधारेल आणि मूव्हओएस २.० अद्यतनासह नवीन वैशिष्ट्ये देखील जोडेल. ओला एस १ प्रोमध्ये क्रूझ कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, ‘टेक मी होम’ लाइट्ससह रिमोट स्टार्ट/स्टॉप आणि लॉक/अनलॉक यांसारखी प्रीमियम वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. कंपनीने स्कूटरच्या दोन्ही चाकांमध्ये फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेकसह एकत्रित ब्रेकिंग सिस्टम दिली आहे. स्कूटरला ३६ लिटर सीटखाली स्टोरेज स्पेस मिळतो. यात दोन ओपन-फेस हेल्मेट आरामात सामावून घेऊ शकतात.

2022 होंडा आफ्रिका ट्विन अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स बाइक भारतात लाँच, ६ स्पीड गिअरबॉक्ससह मिळणार ‘हे’ फिचर्स

कंपनीने ओला एस १ प्रो स्कूटरमध्ये ८.५ किलोवॅटची बॅटरी दिली आहे. नॉर्मल, स्पोर्ट्स आणि हायपर असे तीन राइडिंग मोड मिळतात. इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड ११५ किमी/तास आहे. केवळ ३ सेकंदात ० ते ४० किमीचा वेग पकडते. कंपनीचा दावा आहे की पूर्ण चार्ज केल्यावर ही स्कूटर १८१ किमी (ARAI प्रमाणित) पर्यंतची रेंज देऊ शकते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ola s1 pro scooter price increase after 18 march 2022 rmt
First published on: 18-03-2022 at 10:54 IST