Renault ही एक फ्रांस वाहन उत्पादक कंपनी आहे. कंपनीने आपल्या Kiger आणि Triber AMT मॉडेलची डिलिव्हरी BS6 2 नियमानुसार भारतामध्ये सुरू केली आहे. या दोन्ही गाड्यांचे इंजिन , किंमत आणि फीचर्स याबद्दल जाणून घेऊयात. तसेच यामध्ये काय बदल करण्यात आला आहे ते पाहुयात.

फ्रान्स कार उत्पादक कंपनी रेनॉल्टने आपल्या गाड्यांसाठी ह्युमन फर्स्ट प्रोग्रॅम जाहीर केला आहे. या अंतर्गत रेनॉल्ट इंडियाच्या उत्पादन लाइनअपला इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम (ESP), हिल स्टार्ट असिस्ट (HSA), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टिम (TCS) आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम PMS) सारखी सेफ्टी फीचर्स देण्यात आली आहेत.

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी
Kinetic Green introduces E Luna an electric scooter for gig workers
गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण

हेही वाचा : ह्युंदाई क्रेटा, ग्रँड विटाराशी स्पर्धा करणार Honda ची Elevate एसयूव्ही; जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी

Renault Kiger मध्ये कंपनीने तीन सिलेंडर असलेले १.० लिटरचे टर्बो पेट्रोल इंजिन आणि १.० लिटरचे एनर्जी पेट्रोल इंजिन दिले आहे. या इंजिनसह XTronic CVT किंवा ५-स्पीड Easy-R AMT ट्रान्समिशनशी जोडलेली आहेत. कंपनीच्या माहितीनुसार ही कार एका लिटरमध्ये २०.६२ किमी इतके मायलेज देते. रेनो किगरला ग्लोबल NCAP द्वारे प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ४ स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. किगरला प्री-टेन्शनर आणि लोड लिमिटरसह चार एअरबॅग आणि सीट बेल्ट देखील मिळतात.

तर Renault Triber बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये तीन सिलेंडरचे १ लिटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ७२ पीएस पॉवर आणि ९६ एनएम टॉर्क जनरेट करते. या इंजिनसह वापरकर्त्यांना ५-स्पीड मॅन्युअल आणि ५-स्पीड AMT चा पर्याय मिळतो. ट्रायब्ररमध्ये किगरप्रमाणेच फीचर्स आणि सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. या MPV ला ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये ४ स्टार सुरक्षा रेटिंग देखील मिळाले आहे. याशिवाय, याला त्याच्या सेगमेंटमध्ये ६२५ लिटर इतकी मोठी बूट स्पेस मिळते.

रेनॉल्ट किगर आणि रेनॉल्ट ट्रायबर (Image Credit- Loksatta Graphics Team)

किगर आणि ट्रायबरची किंमत

Renault ने Kiger आणि Triber AMT मॉडेलची डिलिव्हरी BS6 2 नियमानुसार भारतामध्ये सुरू केली आहे.कंपनीने किगर कारला ८.४७ लाखांच्या सुरूवातीच्या किंमतीमध्ये लॉन्च केली आहे. तर Triber AMT मॉडेलची सुरूवातीची किंमत ८.१२ (एक्सशोरूम )लाख रुपये आहे.