scorecardresearch

Premium

ह्युंदाई क्रेटा, ग्रँड विटाराशी स्पर्धा करणार Honda ची Elevate एसयूव्ही; जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी

होंडा एलिव्हेटच्या बुकिंगला पुढच्या महिन्यात सुरुवात होणार आहे.

top 5 things know about honda elevate
होंडा Elevate बद्दल महत्वाच्या गोष्टी (Image Credit- Financial Express)

Honda Elevate Launch: होंडा हा भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील महत्त्वपूर्ण ब्रॅण्ड आहे. नुकतंच या कंपनीची Honda Elevate SUV कार जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आली आहे. ही आलिशान गाडी भारतीय बाजारपेठांमध्ये सणासुदीच्या काळात उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे. होंडा एलिव्हेट खरेदी करण्यासाठीच्या बुकिंगला जुलै म्हणजेच पुढच्या महिन्यात सुरुवात होणार आहे. त्यात अभिमानाची बाब म्हणजे ही SUV कार सर्वात आधी आपल्या देशामध्ये दिसणार आहे. Financial express ने दिलेल्या माहितीनुसार, Honda Elevate मिळवणारे भारत ही जागतिक स्तरावरील पहिली बाजारपेठ असणार आहे. Honda Elevate बद्दल आपण आज पाच अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्याची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे.

प्लॅटफॉर्म आणि डिझाइन

होंडा Elevate ही कार कंपनीच्या जागतिक स्मॉल कार प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. ज्यामध्ये मिड साईझची सेडान देखील येते. elevate कारमध्ये डिझाईनमध्ये ग्रीलसह एलईडी हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत. या गाडीमध्ये अपराइट ग्रील, स्लीक एलईडी हेडलाइट्स, स्क्वेअर व्हील कमानी आणि हाय वेस्टलाइन आहे. यामुळे एसयूव्हीला बुच लुक मिळतो. जागतिक बाजारपेठेमधील HR-V आणि CR-V कडून कारच्या एकूण डिझाइनची प्रेरणा घेतली आहे. ही कार कंपनीच्या SUV Cars Segment मधील अन्य Urban SUVs प्रमाणे Honda Elevate ची निर्मिती करण्यात आली असल्याचे होंडा कंपनीने सांगितले आहे.

boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
Shinde Fadnavis Pawar
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?
virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण

हेही वाचा : मारूती सुझुकीने जाहीर केली ‘या’ कारची किंमत, महिंद्रा Thar ला देणार टक्कर, जाणून घ्या फीचर्स

इंजिन आणि गिअरबॉक्स

Elevate SUV मध्ये १.५ लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन होंडा सिटीला देखील असलेला बघायला मिळते. हे इंजिन ११९ बीएचपी आणि १४५ एनएम टॉर्क जनरेट करते. यामध्ये ट्रान्स्मिशनसाठी ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स जोडण्यात आले आहे. तसेच कंपनी पुढील तीन वर्षांमध्ये या कारची इलेक्ट्रिक सिरीज लॉन्च करण्याची शक्यता आहे.

फीचर्स आणि सेफ्टी

Honda Elevate मध्ये वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, प्रीमियम स्पीकर्स, वायरलेस चार्जिंग, 7-इंचाचा TFT इन्स्टूमेंट डिस्प्ले तसेच 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम असा काही खास फीचर्स असणार आहेत. यामध्ये सनरुफ देखील उपलब्ध असणार आहे. पण क्रेटा कारच्या तुलनेमध्ये त्याचा आकार काहीसा लहान आहे. या कारमध्ये ADAS जोडलेले आहे. ज्याला होंडा कंपनीने ‘Honda Sense’ असे नाव दिले आहे.

हेही वाचा : Honda Elevate, Hyundai Creta की Kia Seltos कोणती SUV कार आहे बेस्ट; जाणून घ्या आकारमानानुसार तुलना

किंमत आणि स्पर्धा

Honda Elevate चे प्री बुकिंग जुलै महिन्यामध्ये सुरू होणार आहे. तसेच याचे अधिकृत लॉन्चिंग हे सणासुदीच्या काळामध्ये होईल. म्हणजेच सप्टेंबर किंवा आक्टोबर २०२३ च्या आसपास लॉन्चिंग होऊ शकते. याची एक्स-शोरूम किंमत १२ लाख ते १८ लाख रुपये असण्याची शक्यता आहे.Honda Elevate कार ह्युंदाई Creta, ia Seltos, Maruti Suzuki Grand Vitara आणि Toyota Hyryder यांच्याशी स्पर्धा करेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Honda elevate engine price competition features top 5 things need to know check details tmb 01

First published on: 08-06-2023 at 09:38 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×