जपानी ऑटोमेकर रेनॉल्टने भारतात त्यांची सब-कॉम्पॅक्ट SUV Kiger चे अपडेटेड व्हेरियंट लॉंच केले आहे. नवीन किगरमध्ये कंपनीने तंत्रज्ञानावर आधारित फीचर्स अपडेट केले आहेत, जे ग्राहकांना खूप आवडतील. दरम्यान सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या सेगमेंटमध्ये असलेली Renault Kiger ची स्पर्धा Nissan Magnite, Hyundai Venue, Maruti Suzuki Vitara Brezza आणि Toyota Urban Cruiser सारख्या SUV शी आहे.
रेनॉल्ट किगरची किंमत
Renault ने अपडेटेड Kiger MY22 ची एक्स-शोरूम किंमत ५.८४ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या कारच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये कंपनीने ड्युअल टोन कलरचा पर्याय दिला आहे, ज्यामध्ये एसयूव्हीचे छत काळ्या रंगात आहे. यासोबतच SUV च्या व्हीलमध्ये १६-इंच डायमंड कट अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत आणि अपडेटेड Kiger MY २२ चे बुकिंग ३१ मार्च २०२२ पासून सुरू होईल.
PM2.5 अॅडव्हान्स अॅटमॉस्फेरिक फिल्टर उपलब्ध असेल
Renault Kiger MY22 SUV मध्ये क्रूझ कंट्रोल आणि वायरलेस फोन चार्जिंग सारख्या वैशिष्ट्यांसह PM२.५ प्रगत वातावरणीय फिल्टर देखील मिळेल. दरम्यान देशातील वाढते प्रदूषण लक्षात घेऊन, सब-कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमधील बहुतेक कंपन्या आता हे फिचर कारमध्ये देत आहेत.
अपडेट फीचर्स
नवीन किगर एसयूव्हीला टर्बो रेंजमध्ये फ्रंट स्किड प्लेट्स, टेल गेटवर क्रोम, टर्बो डोअर डेकल्स आणि नवीन ड्युअल टोनमध्ये नवीन बाह्य रंग मिळतील. यासोबतच इंटीरियरमध्ये बॉस सीट अपहोल्स्ट्री समाविष्ट आहे.
रेनॉल्ट किगर MY22 चे इंजिन
रेनॉल्ट किगर ही कार MT आणि EASY-R AMT ट्रान्समिशनमध्ये १.०L एनर्जी इंजिन आणि MT आणि X-TRONIC CVT ट्रान्समिशनमध्ये १.०L टर्बो या दोन इंजिन पर्यायांसह ऑफर केली गेली आहे . त्याच वेळी, रेनॉल्टचा दावा आहे की ही एसयूव्ही २० किमी मायलेज देते.