टू व्हीलर सेक्टरच्या क्रूझर बाइक सेगमेंटमध्ये, 150cc इंजिन असलेल्या एंट्री लेव्हल बाईक्सपासून ते 650cc इंजिनसह प्रीमियम बाईक्सपर्यंत या बाईक्सची मोठी रेंज आढळते.

जर तुम्ही चांगली डिझाईन आणि मजबूत इंजिन असलेली क्रूझर बाईक घेण्याचा विचार करत असाल. परंतु तुम्हाला कोणतीही बाईक आवडली नसेल, तर तुम्ही या क्रूझर सेगमेंटच्या दोन लोकप्रिय बाइक्सची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.

या तुलनेसाठी, आज आमच्याकडे रॉयल एनफील्ड क्लासिक 350 आणि जावा पेराक बाईक्स आहेत, ज्यामध्ये तुम्हाला या दोघांच्या किमतीपासून ते फीचर्स आणि मायलेजपर्यंत प्रत्येक लहानातला लहान तपशील जाणून घ्या.

Royal Enfield Classic 350: ही बाईक त्यांच्या कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी बाईक आहे, जी पाच व्हेरिएंटमध्ये बाजारात दाखल झाली आहे.

बाईकमध्ये सिंगल सिलिंडरसह 349.34 सीसी इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 20.21 PS पॉवर आणि 27 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

बाईकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही क्लासिक 350 40.8 kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. Royal Enfield Classic 350 ची सुरुवातीची किंमत १.९० लाख आहे (एक्स-शोरूम, दिल्ली), जी टॉप व्हेरिएंटवर जाताना २.२१ लाखांपर्यंत जाते.

आणखी वाचा : मोठी मायलेज असलेली Hero HF Deluxe अवघ्या २२ ते २४ हजारांमध्ये, जाणून घ्या ऑफर

Jawa Perak: जावा पेराक ही क्रूझर सेगमेंटसह तिच्या कंपनीची एक स्टाइलिश आणि लोकप्रिय बाईक आहे, ज्याचा एकमेव स्टॅंडर्ट व्हेरिएंट कंपनीने लॉन्च केला आहे.

बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर त्यात ३३४ सीसी सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 30.64 PS पॉवर आणि 32.74 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 6 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही Jawa Perak क्रूझर बाईक 34.05 kmpl चा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने हा जावा पेराक २,०६,१८७ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) च्या सुरुवातीच्या किंमतीसह लॉन्च केला आहे जो रस्त्यावर २,३६,२७० रुपयांपर्यंत जातो.