कमी बजेटमध्ये सहज उपलब्ध असलेल्या मोठ्या मायलेजचा अभिमान बाळगणाऱ्या बाईक सेगमेंटमध्ये बाईक्सची मोठी रेंज आहे. या रेंजमध्ये आज आम्ही बजाज प्लॅटिना १०० बद्दल बोलत आहोत जी त्यांच्या कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बजाज प्लॅटिनाची सुरुवातीची किंमत ६०.५७६ रुपये आहे जी ऑन रोड असताना ७३,३४७ रुपयांपर्यंत जाते. जर तुम्हाला ही बाईक आवडत असेल, तर ती अर्ध्याहून कमी किमतीत घरी घेऊन जाण्याची संधी आहे. या ऑफरबद्दल संपूर्ण माहिती इथे जाणून घ्या. बजाज प्लॅटिना १०० वर उपलब्ध असलेल्या या ऑफर वेगवेगळ्या वेबसाइट्सवरून आल्या आहेत, त्यापैकी आम्ही तुम्हाला सर्वोत्कृष्ट ऑफर्सचे डिटेल्स सांगणार आहोत.

पहिली ऑफर OLX वेबसाइटवरून आली आहे जिथे या बजाज प्लॅटिनाचे २०१० चे मॉडेल पोस्ट केले आहे. इथे त्याची किंमत १८,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. पण यासोबत कोणतीही ऑफर किंवा प्लॅन मिळणार नाही.

दुसरी ऑफर DROOM वेबसाइटवरून प्राप्त झाली आहे जिथे या बाईकचे २०१० चे मॉडेल पोस्ट केले गेले आहे. इथे या बाईकची किंमत १४,००० रुपये ठेवण्यात आली आहे. ही बाईक खरेदी केल्यावर तुम्हाला एक फायनान्स प्लॅन मिळेल.

आणखी वाचा : ४ लाखांचे बजेट नसेल तर काळजी करू नका, केवळ ८० हजार ते १ लाखात मिळेल Maruti Alto, जाणून घ्या ऑफर

तिसरी ऑफर CREDR वेबसाइटवरून आली आहे जिथे त्याचे २०११ चे मॉडेल पोस्ट आहे. इथे या बाईकची किंमत १६,४९० रुपये निश्चित करण्यात आली आहे. परंतु ते खरेदी केल्यावर तुम्हाला कोणताही प्लॅन किंवा ऑफर मिळणार नाही.

बजाज प्लॅटिनावर उपलब्ध ऑफर्सचे डिटेल्स वाचल्यानंतर, तुम्हाला या बाईकचे इंजिन, फिचर्स आणि मायलेजची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने यामध्ये १०२ सीसी सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन ७.९ पीएस पॉवर आणि ८.३ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ४ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

बाईकच्या मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही बजाज प्लॅटिना ७० ते ९५ किमी मायलेज देते. येथे नमूद केलेल्या तीनही ऑफर्सचे डिटेल्स वाचल्यानंतर, तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार कोणताही पर्याय निवडू शकता.

More Stories onऑटोAuto
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second hand bajaj platina from 14 to 18 thousand know complete details of bike and offer prp
First published on: 07-06-2022 at 19:39 IST