Skoda Kylaq Spotted During Testing: चेक रिपब्‍लिक ऑटोमोबाईल निर्माता कंपनी स्कोडाने अलीकडेच आपल्या नवीन एसयूव्हीचे नाव जाहीर केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Skoda Kylaq नावाची ही SUV नुकतीच टेस्टिंगदरम्यान दिसली आहे. ही मारुती सुझुकी ब्रेझा, टाटा नेक्सॉन, महिंद्रा 3X0, किया सोनेट, ह्युंदाई व्हेन्यू आणि इतर अनेक सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करेल. एसयूव्हीमध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स दिले जाऊ शकतात, ते कधी लाँच केले जाऊ शकते? जाणून घेऊयात.

Skoda Kylaq: नवीन काय आहे?

नवीन Kylaq मध्ये सिंगल-पॅनल सनरूफ आणि अलॉय व्हील्स असेल, जे फक्त टॉप मॉडेल्सवर असण्याची अपेक्षा आहे. ज्यामध्ये सिंगल पेन सनरूफ, रूफ रेल, शार्क फिन अँटेना यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. नंबर प्लेटदेखील आहे. L-आकाराचे LED दिवे असतील, परंतु त्यांना Hyundai Venue प्रमाणे कनेक्ट केलेला प्रकाश मिळणार नाही. व्हिडीओत हे देखील उघड केले आहे की, Kylaq लाल किंवा नारंगी रंगाच्या स्कीममध्ये उपलब्ध असेल.

टेस्टिंगदरम्यान दिसलेल्या युनिटचे डिझाइनदेखील कंपनीच्या इतर एसयूव्हीसारखे आहे. Kylaq ची डिझाइन Skoda Kushaq सारखी असू शकते. तसेच, त्यात अँगुलर टेल लॅम्प डिझाइन मिळू शकते. मात्र, या वाहनाच्या नावाव्यतिरिक्त कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Skoda Kylaq: कधी लाँच होणार ?

Kylaq चे जानेवारी २०२५ मध्ये भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये अनावरण होण्याची अपेक्षा आहे. SUV फेब्रुवारी २०२५ मध्ये शोरूममध्ये येण्याची अपेक्षा आहे. लाँचच्या वेळी त्याची अपेक्षित किंमत सुमारे ७.५० ते ८ लाख रुपये असू शकते.

हेही वाचा >> Tata Curvv EV: ही नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी तुटून पडले ग्राहक; लाँचिंगनंतर वेटिंग पीरियड पोहचला चक्क ५६ दिवसांवर

Skoda Kylaq: इंजिनचे वैशिष्ट्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतर गाड्यांप्रमाणे यातही एक लिटरपर्यंतचे इंजिन दिले जाऊ शकते. ज्यामध्ये टर्बो इंजिन तीन सिलेंडरसह दिले जाईल. तसेच, मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायदेखील यामध्ये उपलब्ध असतील. Kylaq हा क्रिस्टल या संस्कृत शब्दापासून बनलेला आहे.