Best Mileage Scooters: देशातील टू-व्हीलर सेगमेंटमध्ये आता बाईकप्रमाणेच स्कूटरची देखील मोठी रेंज उपलब्ध आहे. भारतात अनेक ऑटोमॅटिक स्कूटर्स उपलब्ध आहेत. ज्या दमदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससह येतात. त्यामुळेच या स्कूटर्स देशभर लोकप्रिय आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय वाहन बाजारात स्कूटर्सचा दरारा वाढला आहे. तुम्ही देखील एखादी नवीन स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण, यात आम्ही तुम्हाला देशातल्या सर्वात बेस्ट स्कूटर दमदार परफॉर्मन्सवाल्या स्कूटर्सची माहिती देणार आहोत. जे तुम्हाला कमी किमतीमध्ये जबरदस्त मायलेज देखील देते. या स्कूटर्सची आणि किंमतींची माहिती पाहून तुम्ही परफेक्ट स्कूटरची निवड करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Suzuki Access 125 (मायलेज: 64 kmpl)

Suzuki Access 125 कंपनीने या स्कूटरमध्ये १२४ सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडरयुक्त फ्यूल इंजेक्टेड इंजिन दिले आहे. हे इंजिन ८.७ PS पॉवर आणि १०Nm टॉर्क जनरेट करते. स्कूटर कंपनीचा दावा आहे की ती ६४ kmpl चा मायलेज देते. हा मायलेज ARAI प्रमाणित आहे. Suzuki Access 125 ची किंमत ७७,६०० रुपयांपासून सुरू होते.

(आणखी वाचा : Top 3 Cheapest CNG Cars: ‘या’ आहेत कमी किमतीत सर्वाधिक मायलेज देणाऱ्या सीएनजी कार, मायलेज पाहून लगेच खरेदी कराल )

TVS Jupiter 110 (मायलेज: 62 kmpl)
टीव्हीएस ज्युपिटर ही कंपनीसह देशातील सर्वाधिक विकल्या जाणार्‍या स्कूटरपैकी एक आहे. कंपनीने यामध्ये १०९.७ सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन ७.८८ पीएस पॉवर आणि ८.८ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. मायलेजबद्दल टीव्हीएस मोटर्सचा दावा आहे की ही स्कूटर ही स्कूटर 62 kmpl चा मायलेज देते, जे Honda Activa पेक्षा जास्त आहे. या स्कूटरची किंमत रु. ६९,९९० पासून सुरू होते.

Yamaha Fascino Hybrid 125 (मायलेज: 69 kmpl)
यामाहाची Fascino 125 हायब्रिड १२५ सीसी, एयर-कूल्ड, फ्यूल-इंजेक्टेड इंजिनद्वारे संचालित आहे, जे ८ hp पॉवर आणि १०.३ Nm टॉर्क जनरेट करतं. नवीन मॉडेल आधीच्या मॉडेलच्या ९.७ एनएमपेक्षा जास्त टॉर्क ऑफर करतं. या व्यतिरिक्त, स्कूटरला स्टँडर्ड साइड स्टॉप इंजिन कट-ऑफ स्विच मिळतो.यामाहाची Fascino Hybrid 125 स्कूटर त्याच्या स्टाइलसह मायलेजच्या बाबतीत खूपच चांगली आहे. ही स्कूटर 69 kmpl चा मायलेज देते असा दावा केला जात आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suzuki access 125 tvs jupiter 110 yamaha fascino hybrid 125 are the best scooters in the country mileage is strong pdb
First published on: 05-12-2022 at 10:40 IST