Bike Care Tips: मार्च महिन्यात हवामान बदलू लागते. तापमानात वाढ झाल्यामुळे त्याचा आपल्यासह वाहनांवर खोलवर परिणाम होतो. उन्हाळ्यात बाईकला सर्वाधिक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच या काळात बाईक रायडर्सनी त्यांच्या बाईकची चांगली काळजी घेणे महत्त्वाचे आहे; जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही.

बाईकची घ्या काळजी

इंजिन ऑइल तपासा

उन्हाळ्यात इंजिन लवकर गरम होते म्हणून योग्य ग्रेडचे इंजिन ऑइल वापरा. जर तेल जुने झाले असेल, तर ते वेळेवर बदला.

टायरचा दाब योग्य ठेवा

उन्हाळ्यात टायरमधील हवा पसरते, ज्यामुळे पंक्चर किंवा स्फोट होण्याचा धोका वाढतो. उत्पादकाने शिफारस केल्याप्रमाणे टायरचा दाब नेहमी योग्य प्रमाणात ठेवा.

बाईक सावलीत उभी करा

कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी बाईक सावलीच्या ठिकाणी उभी करा. थेट सूर्यप्रकाशात उभ्या केलेल्या बाईकची सीट आणि इंधन टाकी खूप गरम होऊ शकते.

नियमित सर्व्हिसिंग करा

उन्हाळ्यात बाईकची विशेष काळजी घेण्यासाठी तिचे नियमित सर्व्हिसिंग करा. इंजिन, ब्रेक, चेन व एअर फिल्टर स्वच्छ ठेवा.

कूलिंग सिस्टीमकडे लक्ष द्या

जर तुमच्या बाईकमध्ये रेडिएटर असेल, तर त्यातील कूलंट लेव्हल तपासा. जास्त सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी एअर-कूल्ड इंजिन असलेल्या बाईक पार्क करू नका.

ब्रेकची काळजी घ्या

उन्हाळ्यात ब्रेक लवकर गरम होऊ शकतात, ज्यामुळे त्यांच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो.

बॅटरीची देखभाल करा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॅटरीमधील पाण्याची पातळी तपासा आणि आवश्यकतेनुसार डिस्टिल्ड वॉटर घाला. बाईक जास्त वेळ उभी करून ठेवू नका. अधूनमधून ती सुरू करून, कार्यरत राहील याची दक्षता घ्या.